Saturday, 18 February 2017
मुख्यमंमंत्र्यांची पुण्यातील सभा गर्दीअभावी रद्द करण्याची ओढवली नामुष्की- सोशल मीडियावर मात्र जोकचा पाऊस
संपूर्ण महाराष्ट्रभर भाजपचे स्टार प्रचारक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभांमधून प्रचाराचा धडाका लावला आहे.पुण्यात मात्र गर्दीच नसल्याने सभाच गुंडाळण्याची नामुष्की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ओढावली. सदाशिव पेठेतील टिळक रोडच्या सभेकडे पुणेकरांनी पाठ फिरवल्याने, मुख्यमंत्र्यांना भाषण न करताच माघारी फिरावं लागलं , सभेसाठी आणलेल्या असंख्य खुर्च्या तशाच रिकाम्या पाहून नाराज मुख्यमंत्र्यांनी स्टेजवर न जाताच पुढील सभेसाठी जाणे पसंत केले ,
पण याची सोशल मीडियावर मात्र ताबडतोब दखल घेत जोरदार खिल्ली उडवली गेली आणि पुणेरी पाट्यांचा पाऊस पडला ,
तो असा ,
मुख्यमंत्र्यांच्या सभेला ‘पारदर्शक’ गर्दी !
मुख्यमंत्र्यांची दुपारी एकची सभा रद्द… कोणीही जमलं नाही सभेला…अरे… 1 ते 4 पुणे बंद असत…मग तिकडे मुख्यमंत्रीही असो….. पुणेेरी बाणा शेवटी तो… याला म्हणतात नियम तो नियम…
पुण्यात, तेही सदाशिव पेठेत, दुपारी 1 ते 4 मध्ये सभा? कल्पनाच करवत नाही.
याला म्हणतात ‘हात दाखवून अवलक्षण’. एक तर ते पुणं, त्यात सदाशिव पेठ टिळक रोड आणि वर दुपारी तीन वाजता! ही मुभा तर पेशव्यांनाही नाही!!
अब की बार
कुणाचेही सरकार
इथे दुपारी झोपतो मतदार.
नवीन पुणेरी पाटी ????????????
तरी बरं मुख्यमंत्री सभाच घ्यायला गेले… चितळेंकडे बाकरवडी घ्यायला गेले नाहीत !
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment