Powered by Blogger.

Sunday, 19 February 2017

राजकारण हा आमचा राजधर्म पोटापाण्याचा धंदा नव्हे : समराजितसिंह घाटगे

No comments :


मुरगुड प्रतिनिधी

समीर कटके

जातीभेद नष्ट करून मागासवर्गीय समाजाला मुख्यप्रवाहात आणण्यासाठी शाहू महाराजांनी

गंगाराम कांबळे यांना हॉटेल काढून दिले त्याच हॉटेल मध्ये स्वतः चहा घेणाऱ्या राजर्षीनी

राजसत्तेचा वापर करून सामाजिक समता प्रस्थापित केली. त्याच शाहूंच्या रक्ताचा व विचारांचा

मी वारस आहे. मागास समाजाचा निधी पळवून त्यांना वंचित ठेवणाऱ्या माझ्या मित्रा प्रमाणे

राजकारण हा माझ्या पोटापाण्याचा धंदा नाही, तर राजकारण हा माझा राजधर्म आहे असे

प्रतिपादन शाहू साखरेचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी केले.

यमगे ता कागल येथे चिखली जि प मतदार संघातील उमेदवार चिंगुताई घुगरे व यमगे

पंचायत समितीचे उमेदवार नानादाजी पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत ते

बोलत होते. गोकुलचे संचालक रणजितसिंह पाटील प्रमुख उपस्थिती

श्री घाटगे म्हणाले, पं स समितीची सत्ता आपल्याच कब्जात ठेवणाऱ्या सत्ताधीशानी किती

गंगाराम उभे केले याचे उत्तर द्या. मागास समाजास नाडून त्यांचा केवळ मतांसाठी वापर

करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे तरुण जागा झाला आहे व त्यांच्यात विद्रोहाची ठिणगी पेटली आहे,

या निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे. भाजपच्या माध्यमातून सामान्य कुटुंबातील तरुण व

महिलांच्या हातात सत्ता पोहचवणार आहे. केवळ गट तट बघून मते टाकू नका भविष्याची

पेरणी करा भाजपच्या विकासाच्या प्रवाहात सहभागी व्हा असे आवाहन त्यांनी केले. स्त्रिया व

तरुणांना व्यवसायात उभे करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजना उंबऱ्यापर्यंत

आणणार त्यासाठी भाजपाला ताकद द्या, असे आवाहन त्यांनी केले.


रणजितसिंह पाटील म्हणाले , सामान्य माणसालाच सामान्य माणसाच्या व्यथा समजू

शकतात, म्हणून लोकांच्या सुखदुःखाशी नाळ असणारे उमेदवार दिले.त्यांना एकटे पडू नका.

120 आमदार असणारे राज्यातील व स्पष्ट बहुमत असणारे केंद्रातील मोदी सरकार लोकहिताचे

असल्यामुळे पुढील दहा वर्षे ते अबाधित राहील. मते जास्त पडली तर आमची कमी पडली तर

पाटील-राजे गटाने मते टाळी नाहीत अशी वृत्ती विरोधकांची आहे. याला सामान्य कार्यकर्ता

दबला होता आता तो मुक्त झाला आहे.

स्वागत व प्रास्ताविक नवनाथ पाटील यांनी केले, सागर सुतार याचे मनोगत झाले.

दत्तामामा खराडे, आनंदा मांगले, वसंतराव घाटगे, पी एन देसाई, चंद्रसेन घोरपडे, संजय घाटगे,

विश्वजित पाटील, संतोष वंडकर, दगडू शेणवी, सुशांत घाटगे, अनंत फर्नांडिस, वाय एस

पाटील, राहुल घाटगे उपस्थित होते. आभार विजय गुरव यांनी मानले.

चौकट

यमगे येथील सभेत प्रा संजय मंडलिक यांनी भाजपाला मते टाकून वाया घालवू नका असे

विधान केले होते तोच धागा पकडून समराजीतसिंह घाटगे म्हणाले नोटबंदीमुळे प्रचंड निधी

सरकारच्या तिजोरीत जमा झाला आहे त्यातून मोठी विकासकामे उभी राहणार आहेत. केंद्रात

व राज्यात भाजपचे सरकार असल्यामुळे ही तिजोरी धनुष्यबाणाच्या चावीने नव्हे तर

कमळाच्या चावीने उघडणार आहे. धनुष्यबाणाला मते टाकून वाया न घालवता विकासनिधीचा

फायदा घेण्यासाठी कमळालाच मतदान करा

No comments :

Post a Comment