Powered by Blogger.

Monday, 20 February 2017

मतदान अधिकारी व टोल कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची ,एस टी बसेस टोल नाक्यावर अडवल्या

No comments :

मुरगुड
प्रतिनिधी

कागल जि प व पं स निवडणुकांसाठी तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांसाठी निवडणूक यंत्रणा व
मतदान अधिकाऱ्याना घेऊन जाणाऱ्या एस टी बसेस कोगनूळी टोल नाक्यावर अडवल्यामुळे काही काळ
वाहतूक ठप्प झाली. निवडणूक आयोगाचे आदेश व परवाने दाखवून सुद्धा टोल कर्मचाऱ्यांनी आडमुठी
भूमिका घेतल्याने पोलिस कर्मचारी, मतदान अधिकारी व टोल कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली.निवडणुकीचे  कर्तव्य बजावण्यासाठी जाणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांनासुद्धा टोल बुथवरील कर्मचाऱ्याच्या अरेरावीला सामोरे जावे लागले तेंव्हा सामान्य नागरिकांची काय दशा होत असेल ?
पण या निमित्ताने दोन सरकारी खात्यामधील समन्वयाच्या अभावाचे उदाहरण समोर आले .

No comments :

Post a Comment