Powered by Blogger.

Friday, 24 February 2017

'मी नाही माझे काम बोलते - राजेश पाटील

No comments :
सुधाकर निर्मळे - हेरले प्रतिनिधी
दि.२४/२/१७



सभापती राजेश पाटील यांनी राजकारणाच्या प्रवाहात उलटे पोहत धैर्यशील माने यांची दादागिरी मोडीत काढून हॅट्रीकचे मनसुबे उधळून लावले. भाजपाचे आमदार सुरेश हाळवणकर व माजी आमदार महादेवराव महाडीक यांना 'मी नाही माझे काम बोलते'! हे दाखवून देऊन राजेशचे ही 'राज' राजकारणात आहे.याचा दाखला रुकडी जिल्हा परिषद मतदार संघात शिस्तबद्धपणे प्रचार यंत्रणा राबवून,युवकांचा पाठिंबा व गटनेत्याची साथ मिळवण्यात यश मिळविलेआणि पत्त्नी डॉ.पद्माराणी पाटील यांच्या उमेदवारीने वेदांतिका धैर्यशील माने यांना पराभूत करून विजयी होऊन दाखविले.
रूकडी जिल्हा परिषद संघासाठी सर्वसाधारण स्त्री वर्गासाठी आरक्षण पडले.सभापती राजेश पाटील यांनी आपल्या बरोबर सर्वधर्मिय कार्यकर्ते असल्याने त्यांना रुचेल पटेल अशा आघाडीतून उमेदवारी करण्याचा सावध पवित्रा घेतला होता.माजी आमदार महादेवराव महाडीक यांनी ताराराणी आघाडीतून राजेश पाटील यांना संधी देण्याचा निर्णय घेतला होता.मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून धैर्यशिल माने यांनी उमेदवारी न घेता यूवक क्रांती आघाडीची स्थापना करून भाजपाचा पाठींबा मिळविला व समोरील बलवान उमेदवार सभापती राजेश पाटील यांचा ताराराणी आघाडीतून पत्ता कट करून त्यांनी आपल्या पाठीशी राहावे अशी खेळी खेळली आणि आपल्या समोरील कडवे आव्हान संपुष्टात आणत एकतर्फी विजयाची आखणी केली.
सभापती राजेश पाटील यांनी अडीच वर्षाच्या कालखंडात हेरले,माले,चोकाक,अतिग्रे,आदी गावांमध्ये कोटयावधी रूपयांचा विकास निधीची कामे करून जिल्हा परिषद निवडणूकीची तयारी केली होती.हेरले ग्रामपंचातीवर दहा वर्षे सत्ता अबाधित ठेवली आहे.विरोधी गटाचे गटनेते बालेचाँद जमादार यांना आपली सत्ता असतांना त्यांना 'सरपंच'पदी विराजमान करून गावात राजकिय एकरूपता आणत जिल्हयात अजातशत्रूचे मूर्तिमंत उदाहरण राजकारणात दोन्ही गट एकत्रित आणून हे दाखवून दिले.
हेरले गावात विरोधच न राहिल्याने रूकडी जिल्हा परिषद व हेरले पंचायत समिती निवडणूक लढण्याचा निर्धार दोन्ही गटाने केला होता.यानुसार कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन खास.राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उमेदवारी घेतली.शिवसेना आमदार डॉ.सुजित मिणचेकर यांचा पाठिंबा मिळवून रुकडी पंचायत समिती उमेदवारी शिवसेनेस देऊन अतिग्रे व रूकडी गावातील मतदानाचे नियोजनाची पध्दत- शिरपणे आखणी केली.
सात गावांमध्ये आपणांस सहकार्य कशा प्रकारे मिळेल यासाठी सभापती राजेश पाटील यांनी रात्रीचा दिवस करून गटनेत्यांचा पाठिंबा मिळविला आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उमेदवार निश्चित करून दाखल केली.
रूकडी गावातून शिवसेनेची पंचायत समिती उमेदवार पिंटू मुरूमकर ,गटनेते डॉ.सनथकुमार खोत,शेतकरी संघटनेचे गटनेते अँड सुरेश पाटील यांनी व्यूवरचना करून घरोघरी प्रचार यंत्रणा राबविली आणि झालेल्या एकूण मतदान ९१८६ पैकी २२८९ मतदान मिळविण्यात यश मिळविले.तर वेदांतिका माने ४५६२ मते मिळाली,तर डॉ.पद्माराणी पाटील २२७३ मतांनी पिछाडीवर पडल्या.
अतिग्रे गावात गटनेते दत्तात्रय बिडकर शिवसेनेचे उपसरपंच प्रविण पाटील ,व्ही.एम.पाटील,वाय.डी.पाटील,आठ ग्रामपंचायत सदस्य आदींनी गावातील प्रचार यंत्रणा गतीमान करून झालेले मतदान २१२० पैकी ९३६ मतदान विजयी उमेदवारास मिळवून देण्यास क्रीयाशिल राहिले.डॉ.पद्माराणी पाटील यांनी २८९ मतांची आघाडी घेतली.वेदांतिका माने ६४७ मते घेतली.
मुडशींगी गावात मनसे जिल्हाध्यक्ष गजानन जाधव यांची एकहाती सत्ताअसल्याने त्यांचा पाठींबा धैर्यशील माने यांना होता.त्यामुळे राजेश पाटील यांना शिवसेना शिवाजी अणुसे व शेतकरी संघटना गटनेते संतोष जाधव यांच्याकडून १६५३ पैकी २७८ मतदान मिळविण्यात यश मिळाले.वेदांतिका माने यांनी १०१६ मते घेतली.डॉ.वेदांतिका पाटील ७३८ मतांनी पिछाडीवर राहिल्या.
चोकाक गावात महाविर आलमाने,बाहुबली पाटील,महावीर पाटील,प्रकाश चौगुले,अरूण व्हनाळे,प्रकाश चोकाककर,सदाशिव हालसवडे,कलगेांड पाटील,शितल चोकाककर,शहाजी कांबळे,विकास चौगुले यांनी प्रचार यंत्रणा गतीमान करून झालेले मतदान १९०८पैकी ७८१ मतदान मिळविण्यात यश मिळविले.वेदांतिका माने यांनी ८४७ मते घेतली.डॉ.पद्माराणी पाटील ६६ मतांनी पिछाडीवर राहिल्या.
माले,मालेवाडी गावांत गटनेते बंटी पाटील उपसरपंच महेश पाटील,सागर खोत,बाबूराव खोत,भरत गावडे ,सुधिर पाटील ,उत्तम पाटील,सुनिल पाटील,दयानंद कांबळे,किरण कांबळे,नाना वरूटे यांनी प्रचार यंत्रणा गतीमान करून झालेले मतदान १५४३ पैकी ६०८ मतदान मिळविले.वेदांतिका माने यांनी ६६४ मते घेतली.तर डॉ.पद्माराणी पाटील ५६ मतांनी पिछाडीवर राहिल्या.
हालोंडी गावात माजी सरपंच दिलीप पाटील,माजी उपसरपंच अरूण पाटील,गटनेते जी.बी.पाटील,सुनिल पाटील,प्रदीप पाटील,राजाराम कांबळे यांनी प्रचार यंत्रणा योग्यपणे राबवून झालेले मतदान १९७९ पैकी ८७५ मते मिळविण्यात यश मिळविले.वेदांतिका माने यांनी ६०६ मते घेतली.डॉ.पद्माराणी पाटील यांनी २६९ मताची आघाडी घेतली.
हेरले गावात सभापती राजेश पाटील व सरपंच बालेचाँद जमादार ,उपसरपंच संदिप चौगुले,मुनिर जमादार,माजी सरपंच रियाज जमादार ,कपिल भोसले,यशपाल पाटील,शशिकांत पाटील,अबू जमादार ,विजय भोसले,संदिप शेटे ,दत्ता भोसले,सुरज पाटील,मनोज पाटील,व सर्व चौदा ग्रामपंचायत सदस्य,तरूण मंडळे पदाधिकारी यांनी घरोघरी प्रचार यंत्रणा राबवून एकूण झालेले मतदान ७४१९ पैकी १७९५ मते वेदांतिका माने यांनी मिळविली. ४९०८ मते मिळवून प्रतिस्पर्धी उमेदवारा ३११३ मताची आघाडी मिळवण्यात यश मिळविले आणि जि.प.सदस्या पदी डॉ.पद्माराणी राजेश पाटील यांची ५१७ इतक्या भरघोस मतांनी निवड झाली.
धैर्यशील माने यांनी आलास व पट्टणकोडोली मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीतून विजय संपादन केला होता.मात्र होम मतदार संघात युवक क्रांती आघाडीतून उमेदवारी करतांना पूर्वीच्या पक्षाचे गटनेते व कार्यकर्त्यांचे बळ, मतदानाची निश्चिती राहिली नाही.पाच वर्षात मतदार संघात चुकूनही दर्शन नाही.सात गावातील गटनेत्यांशी जवळीक, कार्यकर्त्याशी नॉट रिलेशन ,रूकडी पंचायत समितीसाठी कट्टर कार्यकर्त्या ऐवजी नवख्या कार्यकर्त्यास न रुचणाऱ्या उमेदवारास संधी दिली,मी कोणत्याही मतदार संघात विजयी होऊ शकतो असा आत्मघातकी महत्त्वकांक्षा याचा फटका बसून पराभवास सामोरे जावे लागले.
हातकणंगले कॉग्रेस तालूका अध्यक्ष भगवान जाधव यांच्या पत्नी विदयमान जि.प.सदस्या प्रमोदिनी जाधव यांनी मतदार संघात कोटयावधीची कामे केली. मात्र कॉंग्रेस या पक्षाबद्दल जनमानसात नाराजी असलेने त्यांची मोठी पिछेहाट होऊन मोठया पराभवास सामोरे जावे लागले.
१९९७ साली काँग्रेस पक्षातून दिवंगत रामचंद्र वड्ड यांचा जि.प निवडणूकीत विजय झाला होता.तब्बल वीस बर्षानंतर हेरले गावाला जिल्हा परिषद सदस्य पद डॉ.पद्माराणी राजेश पाटील यांच्या रूपाने मिळाले .या पदाच्या माध्यमातून सभापती राजेश पाटील गावातील विकास कामांना गती देतील.

No comments :

Post a Comment