Powered by Blogger.

Friday, 24 February 2017

रेल्वे टीसी चा भ्रष्टाचार

No comments :
आजच आपल्या समस्या सोडवण्यासाठी दे दणका हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले त्याला प्रतिसाद म्हणून दिवसभरात ६ वार्ता व्हॉट्सअँप वर आल्या , त्यातील निवडक व लक्ष्यवेधी समस्या क्रमशः प्रसिद्ध करत आहोत . 

परवा नुकताच  रेल्वे प्रवास करण्याचा प्रसंग आला , आमच्या बोगीत बऱ्याच सीट्स रिकाम्या होत्या ,चार्टवर पण नावे नव्हती अश्या वेळेला टीसी विना तिकीट व जनरल तिकीट प्रवाश्याना त्या सीट्स देत होता आम्ही त्या नवीन आलेल्या सहप्रवाश्याना विचारले असता आम्ही जनरल तिकीट काढले असून टीसीला प्रत्येकी २०० रुपये एक्सट्रा दिले असे सांगितले तसेच कोणतीही पावती केली नाही , तसेच कायम प्रवास करताना आम्ही आरक्षण न करता अश्याच प्रकारे सीट मिळवतो असे सांगितले , म्हणजे रेल्वेचे ३ महिने आरक्षण करून आम्ही ५०० रुपये भरून प्रवास करायचा आणि टीसीने भ्रष्टाचार करून १०० अधिक २०० अश्या अवघ्या ३०० रुपयात फुकट्या ना जागा उपलब्ध करून द्यायची हा अन्यायच आहे , रेल्वे खात्याने किंवा लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने अश्या टीसींना पकडून शिक्षा करावी 

जे वाय कदम , कोल्हापूर 

No comments :

Post a Comment