Powered by Blogger.

Monday, 13 February 2017

जनसेवा करण्याची संधी द्या संधीचे सोनं करून दाखवतो - आम. हसन मुश्रीफ

No comments :


मुरगुड प्रतिनिधी

समीर कटके

 राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कष्टाळू व सामान्य कुटुंबातील आहेत, त्या तुलनेत विरोधी उमेदवार
पैशेवान आहेत. गावातच राहून अडीअडचणींना धावून येणाऱ्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना भरघोस
मतांनी विजयी करून त्यांना काम करण्याची संधी द्या.जि प व पं स मध्ये जनसेवा करण्याची खूप
मोठी संधी असून काम करण्याची एक संधी द्या संधीचे सोनं करून दाखवतो असे आवाहन    माजी मंत्री आम हसन मुश्रीफ यांनी केले.

कुरुकली ता. कागल येथे चिखली जि प मतदार संघाच्या उमेदवार अर्चना पाटील व यमगे पं स
उमेदवार निलेश शिंदे आयोजित केलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सयाजीराव पाटील
होते.


आम मुश्रीफ म्हणाले कुरुकलीच्या ग्रामस्थांनी ही निवडणूक हातात घ्यावी गट तट न पहाता शंभर
टक्के मते द्यावीत कुरुकली ग्रामस्थांची जबाबदारी विकासवाढली असून आपला हक्काचा प्रतिनिधी
निवडून देण्यासाठी तत्पर राहावे असे आवाहन त्यांनी केले.ग्रामीण भारताचा विकास करण्याच्या उदात्त हेतूने पंचायत राज्याची संकल्पना मांडली होती . खेडयातील लोकांना देश उभारणीच्या कामात सामावून घेणे हा हेतू होता पण गेल्या 25 वर्षात ज्या संजय घाटगें कडे ही सत्ता दिली त्यांनी त्याचा उपयोग केवळ स्वतःच्या कुटुंबाला सत्तास्थाने मिळवण्यासाठी केला व गटासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्याला खड्यासारखे बाजूला सारले. अश्या मतलबी लोकांना आता जागा दाखवण्याची वेळ आली आहे .


जिल्हा बँकेचे संचालक भैया माने म्हणाले आता प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे ज्यांना पंचायत
समितीची सत्ता दिली त्यांनी कोणती कामे केली व मुश्रीफनी आमदार मंत्रीपदाच्या काळात कोणती कामे केली जनतेने प्रश्न विचारले पाहिजेत स्वतःची घरे भरणाऱ्यांच्या ताब्यात पुन्हा सत्ता दिली तर तालुकावीस वर्षे पाठीमागे जाईल. एका बाजूला सर्वसामान्य कार्यकर्त्याला नगराध्यक्ष पदाची संधी देण्यासाठी स्वतःच्या भावजईला तिकीट नाकारणारे मुश्रीफ आहेत तर स्वतःच्या मुलांसाठी कार्यकर्त्यांना डावलणारे लोक आहेत, जनतेने न्याय करावा असे आवाहन त्यांनी केले.

     उमेदवार अर्चना पाटील, निलेश शिंदे, विकास पाटील यांची भाषणे झाली. स्वागत व प्रास्ताविक
माजी सरपंच बी आर पाटील यांनी केले .

       यावेळी ऍड जीवन शिंदे, एम व्ही पाटील, दलीतमित्र डी डीचौगले, रंगराव पाटील, बी एम पाटील, दत्ता पाटील केनवडेकर, आबासो खराडे , रणजित सूर्यवंशी,शामराव पाटील यमगेकर, रघुनाथ कुंभार, लक्ष्मण डवरी, गणपती लखू पाटील, यशवंत रामचंद्र पाटीलउपस्थित होते.

No comments :

Post a Comment