Saturday, 25 February 2017
दे दणका ! टीव्ही ,मोबाइलमुळं सैराट झालं जी !
सध्या लहान मुला बरोबर मोठी माणसांनासुद्धा टीव्ही, मोबाईलचे चे वेड लागलेले दिसते आहे ,कारण कोणते चॅनल किती वेळ पहावे याचे भान राहिलेले दिसत नाही. गाणी,विनोद ,सासू सुनांच्या मालिका, त्यांच्या अंगी असणारे गुण अवगुण वाईट विचार यांचे मुलाच्यावर कळत नकळत प्रभाव पडत आसतो.काही कार्यक्रम असे असतात कि पालक,मुले, वयस्कर व्याक्ति तासन तास वेळ घालवतात, वेळेचं बंधन राहत नाही.जेवतांना आपण किती जेवलो,काय खाल्ले, कोणता पदार्थ कसा खाल्ला त्याची चव काय हे सुद्धा कळत नाही.मग अपचन, भूक न लागणे,झोप न येणे,मन चंचल बनणे,आळस येणे,डोळे दुखणे,चित्र स्पस्ट न दिसणे या सारख्या तक्रारी वाढत आहेत.त्यातच मानसिक ताण-तणाव ,भावनिक ताण येणे या प्रकारचे समस्या उदभवतात.घरातील एकमेकांना बोलणे ,सुसंवाद साधने, नातेवाईक ,मित्र,शेजारच्या घरी काय चालले आहे हे सुद्धा माहित नसणे.विद्यार्थ्यांना अभ्यास कसा कारायांचा याचे वेळापत्रक कोलमडते.घरातील मोठी माणसे हे त्या मुलांना खेळाच्या मैदानावर पाढवत नाहीत यामुळे मुंले वाचनाकडे दुर्लक्ष करत आहेत,एखादे पुस्तक वाचावे ,कविता तयार कराव्यात,गोष्टी वाचाव्यात याकडे दुर्लक्ष होत आहे.सध्या टीव्ही व इंटरनेटच्या प्रभावामुळे पालकांचे मुलांवर नियंत्रण राहिलेले नाही.प्रेमप्रकरणातुन मुली पळुन जात आहेत, याचा समाजातील सर्व घटकानी विचार करण गरजेचे आहे.
अजितकुमार पाटील,
मुख्याध्यापक.[राष्ट्रीयपुरस्कार विजेते]
मुख्याध्यापक.[राष्ट्रीयपुरस्कार विजेते]
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment