Saturday, 25 February 2017
अमेरिकेत भारतीय विद्यार्थी बंदुकीच्या दहशतीखाली
फोटो श्रीनिवास कुचीभोटला व हत्त्यारा पुरीनटन
प्रतिनिधी - समीर कटके
अमेरिकेत वर्णद्वेषाच्या मनोवृत्तीतून भारतीयांवरील वाढत आहेत.कॅननस शहरात एडन पुरीनटन या 51
वर्षाच्या नागरिकाने भारतीय इंजिनिअर श्रीनिवास कुचिभोटला वय 32 यांचा गोळ्या झाडून खून
केला.ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर भारतीयांवरील हल्ल्यात वाढ झाली असल्याचे मत तेलंगणा अनिवासी
भारतीय विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉ. एम राजकुमार यांनी व्यक्त केले आहे. या घटनेनंतर
अमेरीकेतील भारतीय नागरिक खासकरून विद्यार्थ्यांच्या मध्ये दहशतीचे वातावरण आहे. भारतीय
विद्यार्थी बंदुकीच्या तोंडाशी असून शिक्षण सोडून परत यावे तर शैक्षणिक नुकसान होऊन लाखो
रुपयांची शैक्षणिक कर्जे फेडायची कशी असा प्रश्न शिक्षण पूर्ण करावे तर घरातील कर्त्या करवत्या
मुलांच्या आयुष्याशी कसे खेळावे असा गहन प्रश्न विद्यार्थी व पालकांना सतावत आहे.
दरवर्षी भारतातून लाखो विद्यार्थी उच्च शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन व नोकऱ्यांसाठी जातात. तेलंगणा व
आंध्रप्रदेशातून दरवर्षी 1 लाख 30 हजाराहून अधिक विद्यार्थी अमेरिकेत जातात.उच्च शिक्षण व
भविष्याचे उज्वल स्वप्न घेऊन जाणारे हे विद्यार्थी सर्वच सधन कुटुंबातील आहेत असे नाही.
सर्वसामान्य कुटुंबातील हजारो विद्यार्थी जमिनी, घरे गहाण ठेवून, शैक्षणिक कर्जे, शिष्यवृत्ती आदींचा
आधार घेऊन अमेरिकेस जातात. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर अध्यक्ष ट्रम्प यांच्या
आगमनानंतर या हल्यांमध्ये वाढ झाली असल्याचे मत डॉ एम राजकुमार यांनी व्यक्त केले आहे. ही
बाब गंभीर असून कॅलिफोर्नियातील वाष्मी रेड्डीच्या हत्येनंतर काही दिवसातच ही घटना घडल्यामुळे
भारतीय नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. विध्यार्थ्यांना घराबाहेर पडणे अवघड बनले
आहे.कमालीच्या तणावात ते दिवस काढत आहेत. अशा दहशतीच्या वातावरणात अभ्यास करियर आदी
गोष्टी मागे पडत आहेत.स्वतःचा जीव वाचवायचा कि करियर करायचे अशी द्विधा मनस्थिती मध्ये
विध्यार्थी आहेत. इकडे भारतात पालक जीव मुठीत धरून बसले आहेत. आर्थिक सुस्थिती असणारे
पालक करियरचे अन्य पर्याय शोधून मुलांना मायदेशी बोलवण्याच्या मनस्थितीत आहेत. डॉ राजकुमार
यांच्या मते पूर्वी भारतीयांच्यावर वर्णद्वेषी मानसिकतेतून लूटमार हल्ले व्हायचे पण आता गोळ्या
झाडल्या जात आहेत.एका महिन्यात दोन घटना समोर आल्यामुळे चिंता वाढली आहे.
सर्वसामान्य आर्थिक पार्श्वभूमी असणारे विद्यार्थी अपरिहार्यपणे राहण्यास बांधील आहेत पण त्यांच्या
जीविताच्या संकटामुळे पालक हवालदिल झाले आहेत. अनेकांचे कोर्सेस पूर्ण होण्यास सहा सात महिने
शिल्लक आहेत, तर काहींचे आत्ताच सुरु झाले आहेत. पूर्वी अमेरिकेत उच्चपदवी नंतर ऐच्छिक
प्रशिक्षणाचा कालावधी तीन वर्षांचा असायचा हा कालावधी व्यावसायिक कौशल्यं व ज्ञान मिळवण्यासाठी योग्य होता पण त्यानंतर तो कालावधी एक वर्षाचा करण्यात आला पण आता तोही काळ पूर्ण करणे जीवास
धोकादायक बनले आहे. एवढे पैसे खर्च करून व्यावसायिक यशासाठी आवश्यक कौशल्ये संपादन करता
येत नसतील, भीतीच्या वातावरणात अभ्यास करावा लागत असेल तर अमेरिकेत शिक्षण घेण्याचा
अट्टाहास कशासाठी ? असा प्रश्न पालक व विध्यार्थ्यांना सतावत आहे.
अशा तऱ्हेने वर्णद्वेष व गन कल्चर वाढून अमेरिकेत भारतीय विद्यार्थी बळी पडणार असतील तर
पुढील काळात भारतीय विद्यार्थ्यांचे अमेरिकेत शिक्षण घेण्याचे प्रमाण कमी होईल.भारत सरकारलाही
याबाबत तीव्र आक्षेप नोंदवावे लागतील.परिस्थिती सुधारली नाही तर त्याचा परिणाम भारत अमेरिका
संबंधावरही होऊ शकतो.

Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment