Sunday, 26 February 2017
मुरगुड अग्निकांड कोळेकर कुटुंबियांचे खास.धनंजय महाडिक यांनी केले सांत्वन
मुरगूड प्रतिनिधी - समीर कटके
मुरगुड येथील अग्निकांडात कोळेकर कुटुंब उघड्यावर पडले.आई वडिलांचा आधार काळाने ओढून
नेला.त्यांची दोन्ही मुले लहान आहेत.आजोबा वार्धक्याने अंथरुणास खिळून आहेत. कुटुंबाच्या मागे
तातडीची मदत उभी करणे आवश्यक आहे. कोळेकर दाम्पत्याचा मुलगा रोहितने शिक्षण घेतानाच आपला
व्यवसायही सांभाळावा यासाठी त्यांचे दुकान उभे करण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करणार आहे. असे
प्रतिपादन खास. धनंजय महाडिक यांनी केले. अग्निकांडात बळी पडलेल्या धनंजय व प्रियांका
कोळेकर यांच्या कुटुंबाच्या सांत्वनासाठी ते मुरगुड येथे आले होते.
त्यांनी मृत धनंजय यांचे आई वडील व मुले रोहित व ज्ञानेश्वरी यांची भेट घेतली व तातडीची मदत
म्हणून 50000 रु मदत जाहीर केली.
दुर्घटनेमध्ये कोळेकर यांच्या दुकानासह महादेव मडीलगेकर यांचे सायकल स्पेअरपार्ट्सचे दुकान व
कृष्णात रानमाळे यांचे टेलरिंग मशीन स्पेअरपार्ट्स विक्रीचे दुकान अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडले. त्यांचे
अनुक्रमे 3लाख व 2 लाखाचे नुकसान झाले. हातावर पोट असणाऱ्या एकूण तीन कुटुंब केंद्र व राज्य
सरकार कडून शक्य तेवढी मदत मिळवून देण्याचे आश्वासन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.
यावेळी शासकीय मदत मिळवून देण्यासाठी पंचनामे व इतर औपचारि कता संबंधित विभागाच्या
कर्मचाऱ्यानी तातडीने पूर्ण करावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खास महाडिक यांनी मुरगुडच्या नागरिकांनी सुरु केलेल्या मदत कार्याची माहिती घेतली.यावेळी
संदीप भारमल, दिग्विजय पाटील, संपत कोळी, पांडुरंग पुजारी, प्रा चंद्रकांत जाधव, बटू जाधव, मोहन
कांबळे, जीवन भोसले, राजू चव्हाण, विनायक भोसले, सतीश लोंढे, शशांक चौगले, रणजित भारमल,
राहुल वंडकर राजू आमते आदी उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment