Tuesday, 28 February 2017
भाजप ज्येष्ठ कार्यकर्त्यालाच आला पारदर्शक प्रशासनाचा अनुभव , कलेक्टरसमोर ठिय्या आंदोलनाची वेळ
Special Report by Dnyanraj Patil
एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री पारदर्शक शासनाच्या गप्पा मारत असताना काल सोमवारी कोल्हापूरात त्यांच्याच पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्त्याला जिल्हाधिकार्यांनी वेळेत भेट न दिल्याने जिल्हाधिकारी दालनासमोर ठिय्या मारावा लागला .याबाबत अधिक माहिती अशी भाजप ज्येष्ठ नेते भाऊसाहेब गणपुले यांनी आणिबाणी काळातील बंदीवास झेलणार्या लढवय्या कार्यकर्त्यांची माहिती व यादी प्राप्त व्हावी यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी डॉ अमित सैनी यांची पुर्वनियोजित भेट मागितली होती , त्यानुसार ते व त्यांचे सहकारी वेळेवर काल सकाळी ११च्या सुमारास गेले असता त्यांना जिल्हाधिकारी बैठकीत असल्याचे सांगुन ताटकळत ठेवण्यात आले पण त्यांच्यानंतर आलेल्या शिवसेनेच्या शिष्ठमंडळाला मात्र जिल्हाधिकारी यांनी बैठकीतुन बाहेर येऊन तत्काळ भेट दिली आणि परत गणपुलेंना बैठक संपेपर्यंत बसायला लावले , यामुळे गणपुले यांनी संतप्त होत जिल्हाधिकारी दालनासमोर ठिय्या आंदोलन केले व सर्वाना समान वागणुक का नाही , ह्रदयविकारग्रस्त व वयोवृद्धांना ताटकळत ठेवणे कितपत योग्य असा सवाल केला ,
या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात कामासाठी आलेल्या नागरिकांमध्ये मात्र प्रशासनाच्या अशा पारदर्शी कारभाराची मात्र जोरदार चर्चा झाली !
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)

No comments :
Post a Comment