Wednesday, 15 February 2017
कोल्हापुरात स्वागतालाच वाळत घातलेल्या कपड्यांचे तोरण
प्रतिनिधि - सतीश पाटील , वडणगे
रत्नागिरी मार्गावरुन कोल्हापूरात प्रवेश करताना शिवाजी पुल ओलांडल्यावर चौकात एक आयलंड लागतो , या आयलंडची दुरवस्था पाहता कोल्हापूर हे भिकार्यांचे शहर आहे काय असा प्रश्न नवख्याला पडतो , या आयलंडचे संरक्षक ग्रील पडले असुन इतर ग्रीलवर कायमस्वरुपी धुणे वाळत घातल्याचे दिसते , एकीकडे स्वच्छ कोल्हापुर सुंदर कोल्हापुरचा नारा द्यायचा आणि दुसरीकडे शहराच्या सौंदर्याला गालबोट लावणारे उद्योग काहीजणांकडुन केले जात आहेत , कोल्हापूर मनपाला तर या आयलंडची फिकीरच नसावी कारण येथे अस्वच्छता पसरली आहे तर संरक्षक भिंती व ग्रीलची दुरवस्था झाली आहे , या निमित्ताने भारत स्वच्छता अभियानाचा बोर्या वाजवण्याचे काम कोल्हापुरकराकडुन व मनपाकडुन केल्याचे दिसते
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
👍
ReplyDelete