Friday, 31 March 2017
मुरगूडला 31 पासून व्याख्यानमाला : हुतात्मा तुकाराम वाचनालय मुरगूड यांच्यातर्फे आयोजन
मुरगूड प्रतिनिधी: समीर कटके
लोकनेते स्व.खासदार सदाशिवराव मंडलिक व स्व.सौ.विजयमाला मंडलिक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 31 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीत सुवर्ण महोत्सवी हुतात्मा तुकाराम वाचनालय मुरगूड यांच्यावतीने स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती गजाननराव गंगापुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वाचनालयातर्फे गेली 10 वर्षे ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात येत आहे.या व्याख्यानमालेचे उदघाटन सहाय्यक धर्मादाय आयुक्त राहुल चव्हाण याच्या हस्ते शुक्रवार ता.31 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे.तर शिवसेनेचे सहसपर्क प्रमुख प्रा.संजय मंडलिक अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.यावर्षीपासून सदर व्याख्यानमालेचे रेकाँर्डींग केले जाणार असून नजीकच्या काळात ते पुस्तक रुपात आणण्याचा मानस असल्याचे श्री.गंगापूरे यांनी सांगीतले.
शुक्रवार ता.31 मार्च रोजी पी.टी. आय.चे पत्रकार व जागतिक कीर्तीचे वृत्त विश्लेषक डॉ.सुभाष देसाई यांचे धर्म आणि विज्ञानाचा आजचा संदर्भ या विषयावर व्याख्यान होईल.
शनिवार ता.1 एप्रिल रोजी प्रा.शिवाजीराव भुकेले यांचेे,तुका आभाळा एवढा... या विषयावरील,
रविवार ता.2 रोजी डॉ.मेघा पानसरे यांचे 21 व्या शतकातील स्त्री,संधी आणि आव्हाने या विषयावरील व्याख्यान होणार आहे.
सोमवार ता.3 रोजी प्रा.डॉ.आदिकराव जाधव यांचे समृद्ध शेतीच्या नव्या वाटा या विषयावर तर
बुधवार ता.5 एप्रिल रोजी डॉ.केदार फाळके यांचे आज्ञापत्रे शिव छत्रपतीची राजनीती या विषयावर व्याख्यान होणार आहे.
या व्याख्यानासाठी प्रा.संजय मंडलीक,नगराध्यक्ष राजेखान जमादार,सौ.वैशाली मंडलिक,उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले, आमदार प्रकाश आबिटकर आदी मान्यवर अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.
समाजातील विविध क्षेत्रात मौलिक योगदान देणाऱ्या पाच व्यक्तीचा स्मृतीचिन्ह देऊन गौरव केला जाणार आहे.
या पत्रकार परिषदेस पी.डी.मगदूम, शिवाजी चौगले,पी.डी.माने, दिनकर पोवार, प्रवीण सुर्यवंशी, भैरवनाथ डवरी, अनिल सिध्देश्वर, अविनाश चौगले,महादेव चौगले, ग्रंथपाल अमर पाटील आदी उपस्थित होते. आभार अँड. खाशाबा भोसले यांनी मानले.
-----------------------------
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment