Powered by Blogger.

Saturday, 1 April 2017

चूक विद्यापीठाची , शिक्षा मात्र विद्यार्थाना.... शिवाजी विद्यापीठाचा भोंगळ कारभार....

No comments :

प्रतिनिधी- अतिश लादे , जोतिबा...

.             शिवाजी विद्यापीठ अंतर्गत सुरु असणाऱ्या परीक्षा मध्ये आज सावळा गोंधळ पाहायला मिळाला, बी.ए, भाग 3 चे सध्या पेपर सुरु आहेत, यामध्ये समाजशास्त्र पेपर 16, या विषयाचा पेपर आज दुपारी 3 वाजता होता , या विषयाच्या परीक्षेसाठी परजिल्हयातून विध्यार्थी आले होते,  पेपरची वेळ सुरु झाली असता,विद्यार्थाच्या हातात सेमिस्टर 5  च्या अभ्यासक्रमावर आधारीत असलेले पेपर आले. त्यामुळे विध्यार्थी देखील हतबल झाले, हि चूक समजताच विद्यार्थांनी पर्यवेक्षकाच्या लक्षात आणून दिली .त्यांनी तात्काळ परीक्षा विभागाला संपर्क साधला. एक तास उशिरा पेपर सुरु करण्यासाठी विद्यापीठ परीक्षा विभागाने सूचना दिली. पण 4 च्या सुमारास पुन्हा विद्यापीठाचे नवीन पेपर आले, पण विद्यार्थ्यांनि पाहिले तर तेही न झालेल्या अभ्यासक्रमावर आधारित होते.विद्यार्थानी परत परीक्षा विभागाकडे तक्रार केली, शेवटी विद्यापीठाशी संपर्क साधला असता , त्यांनी पेपर परत घेण्याचा निर्णय सांगितला, त्याची तारीख लवकरात कळवण्यात येईल असे सांगितले आणि आजचा पेपर रद्द झाला.पण प्रत्यक्षात विद्यार्थ्याची तारांबळ उडाली .परराज्यातील तसेच परजिल्हयातील देखील विदयार्थी , नोकरदार वर्ग सुट्ट्या घेऊन परीक्षेसाठी आला होता. पण आता पुन्हा 4 ते 5 दिवस तारखेची वाट पाहावी लागणार.त्यामुळे विध्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप पाहावयास  मिळाला.....
अशा भोंगळ कारभारामुळे विद्यापीठाची नाचक्की झाली असून या बेजबाबदार व कामचुकार कर्मचाऱ्यांना शिक्षा होणार कि चुकांवर पांघरूण घालून हितसंबंध जोपासनार  ?
....

No comments :

Post a Comment