Powered by Blogger.

Wednesday, 29 March 2017

शिवनाकवाडी गावामध्ये अदृश्य श्री काडसिद्धेश्वर महाराज यांचा प्रवचन सोहळा ..

1 comment :

प्रतिनिधी - सतिश लोहार   

                            मानवी आरोग्य व जमिनीची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी बलशाली व निरोगी भारत निर्माण करण्यासाठी देशी गाई आणि सेंद्रीय शेतीची नितांत गरज आहे . यासाठी  श्री क्षेत्र सिध्द गिरी महासंस्थान कणेरी मठ , दत्त शेतकरी सह . साखर कारखाना ता .शिरोळ व ग्रा.पं. शिवनाक वाडीच्या संयुक्त्त  विधमानाने  गो . जागृती करण्या करीता " गो परिक्रमा २०१७ व सेंद्रिय शेती " या विषयावर अदृष्य श्री काड सिध्देश्वर महाराज यांचे प्रवचन झाले . या सोहळ्यासाठी  मा ..श्री गणपतराव पाटील सो|, मा .श्री रणजीतदादा कदम , गावचे सरपंच श्री गणपती उमराणे ,गावचे पोलीस पाटील श्री विवेक खोत , उपसरपंच सौ शोभा आरगे ,  माजी सरपंच श्री राजाराम खोत , श्री सतिश बरगाले ,ग्रामपंचायत सदस्य श्री दत्तात्रय बुवा , श्री कुमार गावडे , सौ . हिराबाई आरगे , सौ . सरिता खोत , सौ. मंगल काळे , सौ . वासंती खोत , सौ कुसुम चौगुले , गावातील वरिष्ठ मंडळी , नागरिक , महिला मोठया संख्येने "श्री कल्याणताई  देवी " सभामंडपामध्ये उपस्थित होत्या शाहीर श्री मगदुम यांनी प्रवचनाची सुरुवात केली , शिवनाकवाडी हायस्कूल मधील विदयार्थ्यांनी स्वागत गीत म्हटले , प्रवचनाच्या अगोदर सर्वांचा सत्कार ग्रामपंचायत मार्फत करण्यात आला , गो_पालन ज्यांनी केले  आहे त्यांचा सुध्दा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शितल खोत सर , श्री सुखदेव खोत सर यांनी केले , या कार्यक्रमाअगोदर महाराजांनी गावातील गो- मातांना भेट देऊन त्यांना प्रणाम केले , गावातील ग्रामपंचायत व ग्रंथालय याला भेट दिले मोठचा उत्साहात आनंदी वातावरणात कार्यक्रम पार पडला .

1 comment :

  1. ☺☺☺☺☺खूप छान,चांगली बातमी.विषय खूप चांगला

    ReplyDelete