Wednesday, 29 March 2017
Oppoच्या चिनी अधिकाऱ्याकडून तिरंग्याचा अवमान
‘Oppo या चिनी मोबाईल कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांने भारतीय तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप होत आहे. याबाबत नोएडातील दोन हजार कर्मचाऱ्यांनी काल आंदोलन केलं.
अधिकाऱ्याच्या या देश अवमान कृतीने Oppo च्या विक्रीला चांगलाच फटका बसणार आहे कारण आधीच चायनीज असल्याने लोक विचार करून खरेदी करतात.
नोएडाच्या मध्ये Oppo कंपनीचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. तिथे सुहाहू नामक ओप्पोच्या वरिष्ठ चिनी अधिकाऱ्यांने भारतीय तिरंग्याची प्रिंटआऊट फाडून डस्टबिनमध्ये टाकली, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. यावर काही कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेऊनही त्यांनी दुर्लक्ष केल्याचं म्हटलं जात आहे.
या कृत्याचा निषेध करण्यासाठी दोन हजार कर्मचारी 9 तास आंदोलन करत होते. भारतीय झेंड्याचं भव्य पोस्टर कंपनीच्या मुख्य इमारतीवर लावून आंदोलकांनी ‘भारत माता की जय’ अशा घोषणा दिल्या. या घोषणांमध्ये ‘मोदी’ आणि ‘योगी’ यांचे नारेही होते. पोलिसांनी आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र एफआयआर नोंदवल्यानंतरच आंदोलक शांत झाले.
भारतीय कर्मचाऱ्यांच्या लेखी तक्रारीनंतर संबंधित चिनी अधिकाऱ्याविरोधात भारतीय तिरंग्याचा अवमान केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत असल्याचं ओप्पो इंडियाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
No comments :
Post a Comment