Powered by Blogger.

Saturday, 25 March 2017

पेठनाका येथे 42 व्या राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेचे आयोजन

No comments :

लक्ष्मण कांबरे    हेरले/प्रतिनिधी ' दि.२५/३/१७   

                                                                42 व्या राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेचे आयोजन सांगली जिल्ह्यातील नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालय पेठनाका ता.वाळवा येथे 5 एप्रिल ते 8 एप्रिल या कालावधीत संपन्न होणार आहे.अशी माहिती शिक्षण उपसंचालक एम.के.गोंधळी यांनी प्रसिध्दीस पत्रकाद्वारे दिली आहे.
    राष्ट्रीय संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली, भारत सरकार यांचे दिशानिर्देशाप्रमाणे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन,विद्या प्राधिकरण,पुणे,प्रादेशिक विद्या प्राधिकरण, रवीनगर नागपूर व श्री व्येकटेश्वरा शिक्षण संस्थेचे नानासाहेब महाडीक आभियांत्रीकी महाविद्यालय विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 42 वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजीत केले आहे.या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय 'राष्ट्रनिर्माणासाठी विज्ञान,तंत्रज्ञान व गणित' असा निश्चित केलेला आहे.सामाजीक निकड लक्षात घेऊन मुख्य विषयाला अनुसरून पुढील प्रमाणे एकूण सहा उपविषय निर्धारीत केलेले आहे.आरोग्य, उद्योग, वाहतूक व दळणवळण,शाश्वत पर्यावरणासाठी पुनर्वापर योग्य संसाधनावरील नवकल्पना, अन्नउत्पादन व अन्नसुरक्षा नवकल्पना,दैनंदिन जीवनात गणितीय उपाय.
   उपरोक्त उपविषयापैकी कोणत्याही एका विषयावर आधारीत उच्च प्राथमिक स्तर (इ.6 वी ते 8 वी पर्यंत) आणि माध्यमिक व उच्चमाध्यमिक स्तरापर्यंतच्या (नववी ते बारावी) शालेय विद्यार्थ्यांकडून प्रदर्शनिय वस्तु, प्रतिकृती, वैज्ञानीक प्रकल्प यांचे सादरीकरण होणार आहे.या व्यतीरिक्त विद्यार्थ्यांना मुख्य विषयाच्या मुळ संकल्पनेनंतर आधारीत कोणताही उपविषय निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.
    या व्यतिरीक्त प्राथमिक व माध्यमिक शिक्षकाचे अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य, प्रयोगशाळा सहाय्यक /परिचर यांचे प्रायोगीक साधने आणि प्राथमिक व माध्यमिक   शिक्षकांसाठी लोकसंख्या शिक्षण शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शनस्थळी आयोजीत करण्यात आलेले आहे.
   42 व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये प्राथमिक विद्यार्थी (127) ,माध्यमिक विद्यार्थी (127),प्राथमिक शिक्षक (37) ,माध्यमिक शिक्षक (37) ,प्रयोगशाळा सहाय्यक/प्रयोगशाळा परिचर (37),लोकसंख्या शिक्षण (प्राथमिक शिक्षक/माध्यमिक शिक्षक -74) याप्रमाणे एकूण 439 प्रदर्शनीय वस्तू सहभागी होणार आहेत.

No comments :

Post a Comment