Powered by Blogger.

Friday, 24 March 2017

हेरले येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन

No comments :

हेरले /प्रतिनिधी दि. २्४ /३/१७                                                        हेरले (ता. हातकणंगले) येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सरस्वती महिला मंडळ व सृष्टी फौडेशन संचलित जिजामाता विद्यालय व ग्रामपंचायत सर्व महिला मंडळ आणि बचत गट यांच्या वतीने २४ मार्च ते २६ मार्च या दिनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
                 २४ मार्च बचत गट स्टॉलचे उदघाटन हातकणंगले तहसिलदार वैशाली राजमाने जि .प . सदस्या वंदना मगदूम, माहिलांच्या विविध खेळांचे प्रात्यक्षिक उदघाटक पं. स. सदस्या महेरनिगा जमादार सायंकाळी व्याख्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगीता राजू शेट्टी, जि.प . सदस्या शुभांगी शिंदे आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत. रात्रौ८ वाजता महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम उदघाटक स्वरूपा पाटील,वर्षा बिडकर, सविता पाटील,
               २५ मार्च रोजी भव्य महिला रॅली, माहिलांचे विविध स्पर्धा,माता पालक या विषयावर व्याख्यान होम मिनिस्टर आदी कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाचे उदघाटन मौसमी आवाडे शिल्पा पाटील नयन पाटील सभापतीरेश्मा सनदी उपसभापती शंकुंतला देशमुख वैशाली राजेश क्षिरसागर आम.डॉ सुजित मिणचेकर जि .प . सदस्य राहूल आवाडे सपना आवाडे लेखा मिणचेकर आदींच्या उपस्थित होणार आहे.
             २६ मार्च रोजी विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण महिला पुरस्कार वितरण राजमाता जिजाऊसंस्कार पुरस्कार संस्कृतिक पाऊलखुणा या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती सरपंच बालेचाँद जमादार खासदार राजू शेट्टी माजी सभापती राजेश पाटील डॉ. पद्मजा पाटील नगरसेविका सोनाली मगदूम जि .प . अध्यक्षा शौमिका महाडिक महापौर हसिना फरास नगराध्यक्षा अल्का स्वामी डॉ. निता माने जि .प . सदस्या पद्माराणी पाटील सरोजनी खोत. अशी माहिती प्रसिध्दीस पोलीस पाटील नयन पाटील यशपाल पाटील माजी सरपंच रियाज जमादार राजू चौगुले किरण पाटील राहुल शेटे  माजी उपसरपंच कपिल भोसले आबू जमादार दिपक जाधव यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.

No comments :

Post a Comment