Powered by Blogger.

Friday, 24 March 2017

अजमेर दर्गाह बॉम्ब स्फोट प्रकरणी दोन आरोपीना आजन्म करावासाची शिक्षा

No comments :

प्रतिनिधी समीर कटके

2007 साली झालेल्या अजमेर दर्गाह बॉम्ब स्फोट प्रकरणी जयपूर स्थानिक न्यायालयाने दोन आरोपीना

आजन्म करावासाची शिक्षा ठोठावली आहे.राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए ) 8 मार्च रोजी भावेश पटेल,

देवेंद्र गुप्ता व सुनील जोशी या तिघांवर आरोप निश्चित केले होते. त्यापैकी सुनील जोशीचा यापूर्वी

मृत्यू झाला आहे. शिक्षा निश्चित करण्यापूर्वी न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या ही प्रक्रिया 18

मार्च रोजी संपली. बुधवारी न्यायालयाने हयात असणाऱ्या दोन्ही आरोपीना आजन्म कारावासाची शिक्षा

ठोठावली.

12व्या शतकातील ऐतिहासिक व पवित्र मानलेल्या अजमेर राजस्थान येथील सुफी दर्ग्यावरील

हल्ल्यासाठी पोलिसांनी पाकिस्तान स्थित इस्लामिक दहशतवादी संघटनांना जबाबदार धरले होते. या

बॉम्ब स्फोटात तिघे ठार व 15 जण जखमी झाले होते.

पण या महिन्यात खास न्यायालयाने देवेंद्र गुप्ता व भावेश पटेल यांना दोषी ठरवले. स्फोटानंतर

महिन्यानंतर सुनील जोशी याचा गोळीबारात मृत्यू झाला होता. त्याच्यावर मृत्यू पश्चात खटला

चालवण्यात आला. स्फोटके बाळगणे, कट करून बॉम्बस्फोट घडवून आणणे असे आरोप ठेवण्यात आले

होते. ईदच्या पूर्वसंध्येला हा स्फोट घडवण्यात आला होता. विशेष कोर्टाचे न्यायाधीश दिनेश कुमार गुप्ता

यांनी बुधवारी हा निकाल दिला.

धार्मिक तेढ निर्माण करणे हा आरोपींचा हेतू होता रमजान महिन्यात मुस्लिमांची धार्मिक भावनांना

दुखावणे हा आरोपींचा हेतू होता असे सरकारी वकील अश्विनी शर्मा यांनी सांगितले. या प्रकरणाची तात्विक

बैठक तयार करून व आर्थिक मदत पुरवल्याच्या आरोपातून 8 मार्च रोजी विशेष न्यायालयाने स्वामी

असीमानंद मुक्तता केली होती.

No comments :

Post a Comment