Powered by Blogger.

Friday, 24 March 2017

गारगोटी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची पोलिस ठाण्यास भेट

No comments :


मुरगुड प्रतिनिधी 

      गारगोटी हायस्कूल व श्री.समर्थ ज्युनि.कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासक्रमातील घटकांचा

प्रत्यक्ष अभ्यास करण्याच्या दृष्टीने नुकतीच भुदरगड पोलिस ठाण्यास भेट देऊन कामाची माहिती

घेतली. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यातील प्रत्यक्ष कामांची माहिती दिली.

      यावेळी पोलीस कोठडी, वायरलेस विभाग, शस्त्रागार यांची विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून

माहिती घेतली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अनंत कांबळे यांनी समाजाच्या स्वास्थ्यासाठी पोलीस

कार्यरत असतात. जनतेनेही पोलीसांचे मित्र बनून सहकार्याची भुमिका घेण्याची गरज आहे. प्रत्येकाने

कायद्याचे पालन केले तर गुन्हे कमी होतील. विद्यार्थ्यांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची

भुमिका घ्यायला हवी.

     शाळेतील विद्यार्थ्यांच्या वतीने पोलीसांना फळे वाटप करण्यात आली. यावेळी हे.कॉ.आर.पी.चौगले,

हे.कॉ.मांगले, कॉ.वसंत घुगे, हरिश सूर्यवंशी, संदीप लाड, बाळासाहेब देऊस्कर आदिंनी पोलिस ठाण्याच्या

कामकाजाची माहिती दिली. यावेळी प्राचार्य मिलिंद पांगिरेकर, बी.एस.चौगले, व्ही.एम.पाटील यांच्यासह

 विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.


No comments :

Post a Comment