Powered by Blogger.

Friday, 24 March 2017

संगीतकार इलाई राजा यांची कॉपी राईट कायद्याचा भंग केल्याबद्दल प्रसिद्ध गायक एस पी बालसुब्रह्मण्यम यांना नोटीस

No comments :


प्रतिनिधी - समीर कटके

राष्ष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार इलाई राजा यांनी वल्ड टूर मधील कार्यक्रमात आपण स्वरबद्ध

केलेली रचना गाऊन कॉपी राईट कायद्याचा भंग केल्याबद्दल प्रसिद्ध गायक एस पी बालसुब्रह्मण्यम

यांना नोटीस पाठवली आहे.

चित्रपट व संगीत क्षेत्रातील त्यांच्या कारकीर्दीस पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा संगीत वृंद

त्यांच्या सन्मानार्थ जगातील विविध देशाच्या दौऱ्यावर आहे. त्यांचा मुलगा एस पी बी चरण व गायिका

चित्रा यांनी हा इव्हेंट ;एस पी बी ; साकारला आहे. या प्रकरणाबाबत एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांनी

सोशल मीडियातून प्रतिक्रिया देताना ; मी कायद्याबाबत अनभिज्ञ आहे. जर असा कायदा असेल तर

मान्य करावा लागेल अशा परिस्थितीत आमचा वृंद इलाई यांनी संगीतबद्ध केलेली गीते सादर करू

शकणार नाही. या दुर्दैवी घटनेनंतर एस पी यांनी एसपी- इलाई विषय चर्चेचा किंवा सनसनाटी बनवू

नका असे आवाहन केले. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियातील पोस्ट मध्ये एस पी यांनी ;कॉपी राईटच्या

उल्लंघन केल्याबद्दल कायदेशीर कारवाई व मोठ्या आर्थिक दंडास सामोरे जावे लागेल; अशी चेतावनी

नोटीसीद्वारे देण्यात आली असल्याचे कबूल केले आहे. कायद्याच्या बाबतीत मी अनभिज्ञ आहे. मला व

माझ्या सहकारी कलावंतांना या प्रकाराबाबत खूप आश्चर्य वाटले आहे कारण याच दौऱ्यात आम्ही त्यांची

गीते टोरांटो, रशिया, मलेशिया, सिंगापूर, श्रीलंका, दुबई या ठिकाणी सादर केली आहेत.

No comments :

Post a Comment