Friday, 24 March 2017
नारायण राणे काँग्रेस पक्ष सोडण्याचा मनस्थितीत कि केवळ चर्चाच ?
प्रतिनिधी समीर कटके
माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते नारायण राणे काँग्रेस पक्ष सोडण्याचा मनस्थितीत आहेत.पक्षात घुसमट
होत असल्यामुळे ते अन्य पर्यायाचा शोधात असल्याची चर्चा सोशल मीडियात रंगली आहे.या बाबत
खुलासा करताना या केवळ चर्चाच असल्याचे मत श्री राणे यांनी व्यक्त केले.
काँग्रेसच्या राज्यातील नेत्याच्या कार्यपद्धतीवर त्यांनी उघडपणे अनेकदा टीका केली आहे. त्यामुळे
पक्षातील त्यांच्या असण्याबाबत सर्व काही ऑल बेल आहे असे नाही.त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी
सेना व भाजपमध्ये रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा सुरु आहे.गेल्या वर्षभरात त्यांचे भाजप नेत्यांशी
सम्पर्क वाढला आहे. रावसाहेब दानवे यांच्या मुलाच्या लग्नासाठी मुख्यमंत्री फडणवीस व राणे एकाच
विमानातून गेले त्यानंतर या चर्चेस अधिक उधाण आले. सेनेनेही आपला खंदा कार्यकर्ता स्वगृही यावा
यासाठी कंबर कसली असून विधान परिषदेत आमदारकी देण्याची तयारी दाखवली आहे. अनिल तटकरे
यांची जागा रिक्त होत आहे ती जागा राणे यांना देण्यास सेना प्रमुख तयार असल्याची चर्चा सोशल
मीडियात रंगत आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment