Thursday, 23 March 2017
मैदानी स्पर्धेत शाहू हाय.ज्यूनिअर कॉलेजचे यश
कागल , प्रतिनिधी, .. येथील श्री शाहू हाय. ज्यूनिअर कॉलेजचा खेळाडू राघू डोणे याने डेरवण येथे झालेल्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत २००मी धावणेमध्ये रौप्य पदक व ४ x १००स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केले. या खेळाडूंना संस्थेचे सचिव प्रा.जयकुमार देसाई, अध्यक्षा शिवानी देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, कौन्सिल मेंबर युवा नेते दौलतराव देसाई, बाळासाहेब डेळेकर, मुख्याध्यापक एम बी रुग्गे आदींची प्रेरणा लाभली. मार्गदर्शन क्रीडा शिक्षक प्रविण देसाई यांचे लाभले.
फोटो - विजयी खेळाडू सोबत मुख्याध्यापक एम बी रुग्गे उपमुख्याध्यापक आर.जी .देशमाने , महादेव सुतार ,नेताजी गिरीगोसावी व क्रिडा शिक्षक प्रवीण देसाई.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment