Thursday, 23 March 2017
मौजे वडगांव (ता .हातकणंगले) येथील श्री जय हनुमान सह .दुध व्याव .संस्था मर्या. चेअरमन पदी महादेव शिंदे तर व्हा . चेअरमन म्हणून शकील हजारी यांची निवड
हेरले/ प्रतिनिधी :
मौजे वडगांव (ता . हातकणंगले) येथील श्री जय हनुमान सह . दुध व्याव . संस्था मर्यादित मौजे वडगांवच्या चेअरमन पदी महादेव शिंदे तर व्हा . चेअरमन म्हणून शकील हजारी यांची निवड झाली .
चेअरमन बाळासो थोरवत व व्हा . चेअरमन शिवाजी रजपूत यांनी राजीनामा दिल्याने दोन्ही जागा रिक्त असल्याने नवीन निवडी करण्यात आल्या . यावेळी संचालक नेताजी कांबरे, निवास शेंडगे सतीश चौगुले, जयवंत चौगुले ,बाळासो चौगुले, सुनिल सुतार, श्रीमती जयश्री यादव, सुषमा कांबरे, सुरेश कांबरे ,प्रकाश पाटील ,सुभाष मुसळे, महादेव चौगुले, श्रीकृष्ण थोरवत ,सचिव आण्णासो पाटील आदी उपस्थित होते .
फोटो :
नुतन चेअरमन महादेव शिंदे यांचा सत्कार करताना डावीकडून संचालक नेताजी कांबरे,रावसो चौगुले, आनंदा पोवार, धोंडीराम चौगुले ,प्रकाश कांबरे ,बाळासो चौगुले ,अनंदा थोरवत सतीश चौगुले.
No comments :
Post a Comment