Powered by Blogger.

Thursday, 23 March 2017

उत्तरप्रदेश मध्ये कत्तलखाने बंद, सर्वात मोठा निर्णय

No comments :

समीर कटके

राज्यातील कत्तलखाने बंद करून गोवंशिय प्राण्यांच्या चोरट्या व्यापारास बंदी घालण्याचा निर्णय उत्तर प्रदेशचे नूतन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीत दिलेल्या जाहिरनाम्यातील तत्वानुसार योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील कत्तलखाने बंद करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनास दिले. गायीच्या चोरट्या व्यापारावर संपूर्ण बंदी घालण्याचें आदेश देवून या बाबत कोणाचीही गय केली जाणार नाही अशी स्पष्ट सूचना  त्यांनी दिली. पण कोणत्या स्वरूपाचे कत्तलखाने बंद करणार याबाबत मात्र अधीकारी सूत्रांकडून कोणतीही माहिती मिळाली नाही. भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यात राज्यातील सर्व बेकायदेशीर व यांत्रिक कत्तलखाने बंद करण्याचे आश्वासन दिले आहे. गोवंश प्राण्यांच्या चोरट्या व्यापारामुळे राज्यातील डेअरी व त्यावर आधारित उद्योग मोडकळीस आला असल्याचे निरीक्षण याच जाहीरनाम्यात नोंदवले आहे. जाहीर प्रचारसभातून बीजेपी अध्यक्ष अमित शहा यांनी सत्तेत आल्यानंतर सर्वच कत्तलखाने बंद करू असे आश्वासन दिले होते.
     या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या आदेशात समाजविरोधी घटकांवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच स्टेटस  सिंबल म्हणून पोलीस संरक्षण घेणाऱ्यांना चेतावणी देण्यात आली आहे. त्यांना जीविताला धोका आहे का याचीही शहानिशा करण्यात येणार आहे.
            
 

No comments :

Post a Comment