Wednesday, 22 March 2017
अपघातानंतर जखमींना त्वरित मदत - समाज जागृती आवश्यक
प्रतिनिधी - सतीश लोहार
इचलकरंजी येथील डेक्कन समोर मेन रोडवर अपघात झाला एकाला टू व्हीलर ने धडक दिली , .
रस्त्यावर काही कालावधीत एक पोलीस कॉन्स्टेबल आले .पोलीस रूग्ण वाहिकेची वाट पाहत होते पण त्या व्यक्तीची परिस्थिती नाजूक होती मी परिस्थिती बघत होतो ,कॉन्स्टेबल पोलीस व मी ,आम्ही दोघांनी एक टाटा टेंम्पो मध्ये लोकांच्या सहाय्याने जखमी झालेल्या व्यक्तीला उचलून ठेवले व इचलकरंजी आयजीएम हॉस्पिटलमध्ये पाठवले.
मला एक गोष्ट लक्षात आली की लोक अपघात झाल्यावर एक तर त्या व्यक्तीची मरणाची वाट पाहत असतात किंवा फक्त रुग्णवाहिकेची वाट पाहत असतात ,
जर त्या व्यक्तीला बघता क्षणीच दवाखान्यात नेले तर त्याचे प्राण वाचू शकतात पण ते धाडस कोणीही दाखवण्याचा प्रयत्न करत नाहीत , समाजात या बदल थोडी जागृती होणे गरजेचे आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment