Monday, 6 March 2017
मुरगुड ज्यु कॉलेज माजी विद्यार्थी 89-90 बॅचचा मेळावा संपन्न
मुरगुड प्रतिनिधी - समीर कटके
शि प्र मंडळ कोल्हापूर संचालित मुरगुड विद्यालय ज्यु कॉलेज मध्ये 1989- 90 या शैक्षणिक वर्षात एसएससी झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा विद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाला. शालेय जीवनातील धूसर झालेल्या आठवणी पुन्हा जागृत झाल्या. दोन तपाहून अधिक काळ व्यवहार, जबाबदाऱ्या, ताण, तणाव, सुख दुःखांच्या सांसारिक गोष्टी पाहून परिपक्व झालेल्या मनामनातून बालपणीच्या आठवणी याव्यात व पुन्हा ते निष्पाप बालजीवन त्याच शाळेच्या प्रांगणात त्याच शिक्षकांच्या साक्षीने जगावे म्हणून महाराष्ट्राच्या विविध भागातून विद्यार्थी विद्यार्थिनी या स्नेहमेळाव्यास उपस्थित राहिले. माजी विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने आपल्या शाळेसाठी शालेय उपयोगी साहित्य भेट दिले.
या प्रसंगी अरविंद कुमठेकर, जे व्ही कटके, पी डी पाटील, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा एस पी पाटील, आर जी गोसावी, एस जी इंदलकर सचरूयांच्यासह माजी विद्यार्थी संजय मांडवे, रणजित सूर्यवंशी, राजू भोळे, संजय मंडलिक यांची मनोगते झाली. स्वागत दिलीप कांबळे प्रास्ताविक प्रदीप हजारे यांनी केले.मेळाव्यास आर डी लोहार, पी एन पाटील, आर जी कोरे, श्री मुजावर, श्रीमती एच ए पाटील, आर जी गोसावी, एम जी नलवडे, सौ कुमठेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलीप कांबळे, सुनील गुरव, गिरीजा कुलकर्णी, सुधाकर जाधव, संजय उपलाने, प्रदीप हजारे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment