Powered by Blogger.

Tuesday, 7 March 2017

 राजू शेट्टींचे विधानभवनासमोर कार्यकर्त्यांसह 'कांदा फेको' आणि 'तूरडाळ फेको' आंदोलन !

No comments :

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मुख्य नेते व खासदार राजू शेट्टी आणि कार्यकर्त्यांनी आज विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन केलं.राजू शेट्टी व आंदोलकांनी तूरडाळ आणि कांदा रस्त्यावर फेकून निषेध व्यक्त केला. कांद्याला हमीभाव द्यावा, अशी आंदोलकांची मुख्य मागणी होती.
पोलिसांनी राजू शेट्टींसह आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.
स्वत:च्या पक्षाच्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या विरोधात तर हे आंदोलन नाही ना ? अशी चर्चा विधानभवन परिसरात रंगली होती तर सत्तेत असुन आंदोलनाची वेळ यावी अशी उपरोधत्मक टीकाही झाली.

No comments :

Post a Comment