Powered by Blogger.

Monday, 6 March 2017

12वीचे सलग तीन पेपर फुटून व्हॉट्सअॅपवर व्हायरल

No comments :

गेल्या आठवड्यात राज्यात 12 वी ची परीक्षा सुरू झाली आहे. 12 वीचे एका पाठोपाठ एक असे तीन पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याचे शिक्षण क्षेत्राचा चांगलीच खळबळ उडाली आहे.
         गेल्या गुरूवारी बारावीचा मराठी आणि सेक्रेट्रियल प्रॅक्टिस पेपर फुटला होता. प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती पडण्याआधी पाच मिनिटे आधीच ती व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाली होती असे समजते तर आज सोमवारी गणिताचा पेपर होता, पेपरची वेळ सकाळी 11 वाजताची होती. मात्र, त्या आधीच 10 वाजून 40 मिनिटांला विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅपवर पेपर व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे , या पेपर फुटीच्या घटना नेमक्या कोणत्या केंद्रावरुन घडत आहेत हे अजुन समोर आले नाही पण यामुळे बोर्डाची विश्वासार्हता मात्र धोक्यात आली आहे

No comments :

Post a Comment