Powered by Blogger.

Monday, 6 March 2017

यंदा पावसाचे प्रमाण चिंताजनक ?

No comments :
प्रतिनिधी मुरगुड -समीर कटके

सन 2017 मधील भारतीय उपखंडातील मोसमी पावसावर अल निनोचा प्रभाव पडण्याची शक्यता नोमुरा
कडून वर्तवली गेली आहे. त्यामुळे भारतीयांच्या चिंता वाढल्या आहेत. सूत्रांच्या मते भारतातील पाऊस व
पिकांवर केवळ अल निनोचाच प्रभाव पडतो असे नाही इतरही अनेक घटक कारणीभूत असतात त्यामुळे
अलनिनो शिवाय इतर घटक फलदायी असतील तर अलनिनोचा विपरीत परिणाम होणार देखील नाही.
अल निनो सक्रिय होण्याची शक्यता वाढली असल्याचे निरीक्षण ऑस्ट्रेलियन ब्युरो ऑफ मिटी ओरॉलॉजी
या संस्थेने नोंदवले आहे. विविध आठ पैकी सात प्रतिमानाच्या सर्वेक्षणातून जुलै 2017 मध्ये अल
निनो सक्रिय होईल अशी शक्यता 50 टक्के इतकी आहे. त्यामुळे या वर्षी पाऊसमान सरासरीपेक्षा कमी
असेल असे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. पर्जन्य व अन्नधान्य उत्पादनावर अलनिनो शिवाय अन्य
घटकांचाही परिणाम होत असतो असे मत नोमुरा इंडिया या संस्थेच्या प्रमुख अर्थतज्ज्ञ सोनल वर्मा यांनी
आपल्या संशोधन पत्रिकेत नमूद केले आहे.

अल निनो ही एक अशी हवामानाची स्थिती आहे जी भारतातील मोसमी पावसास प्रभावित करते.
खरीप पिकांचे प्रमाण खूप मोठे असल्याने भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी पावसाचे प्रमाण सामान्य
असणे अत्यंत गरजेचे असते.

              या स्थितीत मान्सून बद्दल काही चिंता निर्माण झाल्या आहेत. नोमुराच्या विश्लेषणानुसार गेल्या 30
वर्षात ज्या आठ वर्षात अल निनोचा प्रभाव पडला त्यामध्ये सन 1987, 1991,2002, 2004, 2015 या
पाच वर्षात सरासरीपेक्षा कमी तर तीन वर्षा ऋतूत सरासरी इतका पाऊस झाला तर 1994 साली तर
अल निनोच्या प्रभावानंतर सुद्धा पाऊस सरासरीपेक्षा अधिक नोंदवला गेला होता. अलनिनो सागरी प्रवाह
भारतीय उपखंडात केव्हा प्रवेश करणार तो कालखंडही महत्वाचा ठरतो. जुलै महिन्यात भारतात खरिपाची
लागवड झाल्यानंतर जर तो आला तर त्याचा दुष्परिणाम अन्न धान्य उत्पादनावर होईल. पण हीच
परिस्थिती ऑगस्ट महिन्याच्या शेवटी उदभवली तर मात्र त्याचा कोणताही परिणाम पाऊस व पिकावर
होणार नाही.

No comments :

Post a Comment