Powered by Blogger.

Wednesday, 1 March 2017

भाई माधवराव बागल ज्यु.कॉलेज विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ संपन्न

No comments :

कोल्हापूर येथील भाई माधवराव बागल ज्युनिअर कॉलेजच्या बारावी कला व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ नुकताच उत्साही वातावरणात संपन्न झाला , यावेळी अध्यक्षस्थानी असलेल्या मुख्याध्यापक डी.आर.सांडुगडे यांनी  विद्यार्थी वर्गाला मार्गदर्शनपर संबोधन केले. ते म्हणाले ,
परीक्षा म्हणजे आव्हान नसुन एक संधी आहे.त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोण ठेवून परीक्षेला सामोरे गेल्यास यश निश्चित मिळते. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी कठोर परिश्रमास पर्याय नाही.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा.एकनाथ पाटील यांनी केले.याप्रसंगी प्रा.एस एम चौगले व प्रा.सौ एस डी धुरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. प्रमोद अनुसे , प्रा.नंदकुमार घोरपडे , मानतेश स्वामी आदि उपस्थित होते , सुत्रसंचालन द्रौपदि साळोखे व आभारप्रदर्शन प्रा.सी एम कांबळे यानी केले.

No comments :

Post a Comment