Wednesday, 1 March 2017
बेळगाव महापालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितिचा भगवा फडकला - संज्योत बांदेकर महापौर
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्या उमेदवार संज्योत बांदेकर यांची बेळगाव महापौरपदी निवड झाली आहे. तर उपमहापौरपदी नागेश मंडोळकर यांची निवड झाली आहे.
बेळगाव महापौरपदासाठी 61 पैकी 59 जणांचे मतदान झाले. त्यामध्ये बांदेकर यांना 32 मते मिळाली व सहज विजय मिळाला. बेळगावात 58 वॉर्डांपैकी 32 वॉर्डांमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितिचे मराठी नगरसेवक आहेत. आमदार संभाजी पाटील यांनी या सर्वाना एकत्रीत आणुन महापौर पदी मराठी सदस्य निवडुन आणला.
संज्योत बांदेकर यांच्या निवडीमुळे बेळगाववर पुन्हा महाराष्ट्र एकीकरण समितिचा भगवा फडकला आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment