Powered by Blogger.

Wednesday, 1 March 2017

भाजप महिला मोर्चाच्या सरचिटणीस जुही चौधरीला बालकांची तस्करी प्रकरणी अटक

No comments :

प्रतिनिधी - समीर कटके

प. बंगालच्या गुन्हे अन्वेषण विभागाने बंगाल भाजप महिला मोर्चाच्या जनरल सेक्रेटरी जुही चौधरी यांना
बालकांच्या खरेदी विक्रीच्या प्रकरणात सहभागी असल्याच्या आरोपा वरून ताब्यात घेतले आहे. गेल्या काही
दिवसांपासून त्या चौकशीपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होत्या असाही आरोप त्यांच्यावर आहे.
त्यांना पश्चिम बंगाल व नेपाळ सीमेवरील एका खेड्यात सीआईडीच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले.
न्यायालयात त्यांना उपस्थित करण्यापूर्वी त्यांची कसून चौकशी केली जात आहे.

उत्तर बंगाल मधील एका एनजीओच्या माध्यमातून बालकांची विक्री केल्याच्या आरोपाखाली चंदना चक्रवर्ती
यांना सीआयडीने अटक केल्यानंतर जुही चौधरी यांचे नाव एका आठवड्यापूर्वी या प्रकरणात पुढे आले. या
चंदना कथित इंजिओच्या अध्यक्षा होत्या असे निष्पन्न झाले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चंदना यांची अशासकीय संस्था निराधार बालकाश्रम चालवण्याचे काम
करत होती त्या मार्फत बालकांना दत्तक देण्याचे काम चाले, पण अशी संस्था चालवण्याचा आवश्यक परवाना
त्यांच्याजवळ नव्हता. केंद्र शासनाचा असा परवाना मिळवण्यासाठी चंदना या जुही चौधरी यांच्या संपर्कात
होत्या.
तपासामध्ये दिल्ली येथील संबंधित खात्याच्या मंत्रीच्या कार्यालयात जुही चंदनासह अनेकदा गेल्याचे
सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून आले आहे. एवढेच नव्हे तर एका राष्ट्रीय स्तरावरील नेत्याच्या साहाय्याने
संबंधित मंत्र्याशी भेटही निश्चित केली असल्याचे पुढे आले आहे. जुहीचे वडील रवींद्रनाथ चौधरी बंगाल भाजपचे प्रमुख नेते आहेत ते भाजपचे राज्य सचिव पदी कार्यरत होते.
संशयित आरोपींवर बालतस्करी ,षडयंत्र करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

No comments :

Post a Comment