Saturday, 18 March 2017
शिक्षकसेनेच्या प्रयत्नाने इंचलकरंजी ते कोल्हापूर एस.टी.बससेवा सुरू -- महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे आभार.....
.. प्रतिनिधी सतिश लोहार
शिक्षकसेनI कोल्हापूर जिल्हाअध्यक्ष मा.अरूण मुजुमदार सोI यांच्या प्रयत्नाने इंचलकरंजी ते कोल्हापूर एस.टी.बससेवा सुरू करण्यात आली ,सकाळीची कोल्हापूर बस बंद करण्यात आली होती त्यामूळे विदयार्थी , शिक्षक ,नोकरदार ,इतर प्रवासी या सर्व प्रवाशांना त्रास होत होता म्हणून शिक्षक सेनेकडून निवेदन देण्यात आले होते आणि याचा पाठपुरावा सतत केला जात होता , निवेदन देताना कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कांबळे सर ,सतिश लोहार सर , इंचलकरंजी शहर अध्यक्ष गजानन लवटे सर ,जिल्हा सरचिटणीस स्वप्नील पाटील सर , शहर उपाध्यक्ष दिनेश पुरवंत सर, जिल्हा कमिटी सदस्य मुर्तूलें सर ,कोल्हापूर शहर अध्यक्ष संदीप भाट सर , मुल्ला सर यांनी एस टी प्रशासन ला निवेदन दिले ,शिक्षकांच्या समस्या असो किंवा सामाजीक समस्या असो तेथे शिक्षक सेना असेल असे इंचलकरंजी शहर अध्यक्ष श्री गजानन लवटे सर म्हणाले , प्रवासी वर्गाकडून शिक्षक सेनेचे आभार मानले जात आहेत .
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment