Saturday, 18 March 2017
सामाजिक बांधीलकी जपत भाजप युवा मोर्चाची मातोश्री वृद्धाश्रमात आगळीवेगळी रंगपंचमी साजरी

सामाजिक बांधीलकी जपत भाजप युवा मोर्चा ने आगळा वेगळा उपक्रम करत सिद्धाई महिला मंडळ संचालित मातोश्री वृद्धाश्रम येथे रंगपंचमी साजरी केली यावेळी महिला मंडळ अध्यक्ष सौ वैशाली राजशेखर यांनी हा आश्रम हे एक कुटुंब आहे ह्या सर्वांच्या कुटुंबाला आम्ही मातोश्री वृद्धाश्रम न म्हणता प्रेमाश्रम असे म्हणतो असे नमूद करत सर्व सदस्याच्या सोई सुविधा रोजची दिनचर्या व्यवस्थे वर माहिती दिली. सर्वानी रंगपंचमी मध्ये उत्साहाने सहभाग घेतला एकमेकांना रंग लावत गाणी ही म्हटली त्या मुळे तेथील सर्वांचा आनंद द्विगणित झाला होता रंगपंचमी खेळून झाल्यावर सर्व सदस्यांना जिलेबी वाटप करण्यात आली त्या प्रसंगी आश्रमाच्या वतीने आभार मांडताना महिला मंडळाच्या उपाध्यक्ष सौ सूर्यप्रभा चिटनीस यांनी भाजपा युवा मोर्चाच्या या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक करत भविष्यात असेच सामाजिक उपक्रम राबवावेत यासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी आश्रमाचे सर्व सदस्य उपस्थित होते. युवा मोर्चा चे जिल्हाअध्यक्ष मा दिग्विजय कालेकर,जिल्हा महामंत्री मा अक्षय मोरे,जिल्हा सरचिटणीस मा सुमित पारखे,जिल्हा उपाध्यक्ष मा गिरीष साळोखे,मा विश्वजीत पवार,मा अमित माळी,मा अमोल नागतिळे, मा प्रसाद मोहिते, जिल्हा चिटनीस मा सुजय मेंगाने,अल्पसंख्यांक मोर्चा चे अध्यक्ष मा शाहरुख गड़वाले व कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला.आश्रमातील अध्यक्ष,उपाध्यक्ष,सर्व सदस्य या सर्वांचे युवा मोर्चा च्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष मा गिरीश साळोखे यांनी आभार व्यक्त करत काही अड़ीअड़चन असल्यास भारतीय जनता युवा मोर्चा ची होईल तेवढी मदत व सहकार्य असेल अशी ग्वाही दिली.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment