Friday, 17 March 2017
संजय घाटगे भाजपच्या वाटेवर ?
मुरगुड प्रतिनिधी - समीर कटके
कागलचे माजी आमदार संजय घाटगे भाजपच्या वाटेवर आहेत.कागल पंचायत समिती सभापती
निवडीच्या प्रक्रियेत संजय मंडलिक यांनी हसन मुश्रीफ यांच्याशी गटबंधन केल्यामुळे कागल पं स
राजकारणात त्यांचे अस्तित्वच नगण्य झाले आहे.तसेच राष्ट्रवादी शिवसेना आघाडीस सेनेच्या वरिष्ठ
नेत्यांची मान्यता असल्याने येणाऱ्या काळात मंडलिक मुश्रीफ आघाडी अधिक दृढ होणार हे स्पष्ट आहे
त्यामुळे श्री घाटगे यांना भाजप प्रवेशा शिवाय पर्याय राहिला नाही.
संजय घाटगे आज दिवसभर मुंबई येथे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या सोबत होते.पक्ष प्रवेश
अपरिहार्य असला तरी हा निर्णय त्यांच्यासाठी सोपा नाही. भाजपातर्फे पक्ष वाढीची जबाबदारी अगोदरच
युवानेते समरजितसिंह घाटगे यांच्यावर सोपवली आहे. मंत्री चंद्रकांतदादा यांनी अनेकदा कागल मध्ये
कोणालाही पक्ष प्रवेश हवा असेल तर समरजितसिंहाची संमती लागेल असे जाहीर केले आहे. पक्षादेश
असेल तर येणाऱ्या विधानसभेसाठी आपण पक्षाची उमेदवारी लढवू असे समरजितसिंह यांनी जाहीर केले
आहे. तसेच जि प निवडणुक प्रचारात संजय घाटगे यांनी एकदा शाहूची सत्ता आमच्याकडे देऊन बघा
असे वक्तव्य केले होते. याबाबत समरजितसिंह यांनी ;त्यांच्या पोटात होते ते बाहेर आले, त्यांच्या बद्दल
जी थोडी स्पेस तयार झाली होती ती संपली; अशी प्रतिक्रिया दिली होती. तसेच आमदारकी लढवणे ही
संजयबाबा यांच्यासाठी गट बांधणी व इतर सत्ता टिकवण्यास फलदायी स्ट्रॅटेजी सिद्ध झाली आहे.
त्यामुळे पक्ष प्रवेशासाठी विधानसभेच्या तिकिटांचा शब्द मागतील. या सर्व विश्वास अविश्वास, गट
अस्तित्व, महत्वकांक्षा यांच्या अंतर्कलहामध्ये त्यांच्या पक्ष प्रवेशा आड अनेक अडथळे येतील. शिवाय
गोकुळचे माजी अध्यक्ष व संचालक रणजितसिंह पाटील मुरगुडकर अगोदरच भाजप मध्ये आहेत त्यांचे
संजय घाटगे यांच्याशी असणारे सख्य (?) सर्वाना ठाऊक आहे. हे तीन नेते एका पक्षात आले तर कोण
कोणाचे नेतृत्व स्वीकारणार हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.
हे सर्व कंगोरे पहाता संजय घाटगे यांचा पक्ष प्रवेश कसा होतो हे पहाणे रोचक ठरेल. यामध्ये
त्यांच्या मुत्सद्दीपणाचा कस लागणार आहे. येत्या काळात ते काय निर्णय घेतात, मंत्री चंद्रकांतदादा
कसा तोडगा काढणार, समरजितसिंह व रणजितसिंह कसा प्रतिसाद देतात, महादेवराव महाडिक कोणती
भूमिका घेणार या गोष्टी महत्वाच्या ठरतील.

Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment