Sunday, 19 March 2017
प्रवीण माने कर सहाय्यक परीक्षेत उत्तीर्ण.
मुरगुड प्रतिनिधी:
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या 2016 च्या कर सहाय्यक परीक्षेत येथील प्रवीण
प्रकाश माने पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाला. आहेत. त्याची कर सहायक पदी निवड झाली आहे.
प्रवीण माने याचे प्राथमिक शिक्षण मुरगूड येथे तर माध्यमिक शिक्षण शिवराज विद्यालय मुरगूड येथे
झाले.एस.एस.सी.परीक्षेत तो पहिला आला होता.तर उच्च माध्यमिक शिक्षण राजाराम
महाविद्यालय,कोल्हापूर येथे व शिवाजी विद्यापीठ मधील इंग्रजी विषयातील बॅ.बाळासाहेब खर्डेकर
शिष्यवृत्ती प्राप्त केली.सहा ते सात तास मन लावून अभ्यास करून त्यांने हे यश मिळविले आहे.त्याला
संस्था सेक्रेटरी प्रा.संजय मंडलिक,प्राचार्य महादेव कानकेकर,माजी प्राचार्य पी.डी.मगदूम,विक्रीकर
अधिकारी गोपाळ पाटील याचे मार्गदर्शन लाभले. प्रवीण हा मुख्याध्यापक पी.डी.माने यांचा चिरंजीव आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)

No comments :
Post a Comment