Powered by Blogger.

Sunday, 19 March 2017

पत्रकारीता अभ्यासक्रम विदयार्थ्याची शैक्षणिक क्षेत्र भेट

No comments :
प्रतिनिधी - सतीश लोहार 

 पत्रकार ग. गो.जाधव चॅ. दै.पुढारी  कोल्हापूर अंतर्गत पत्रकारीता अभ्यासक्रम  विदयार्थ्याची शैक्षणिक  क्षेत्र भेट आयोजित केली होती ही भेट आदिवासी गाव कोते ता .राधानगरी जि. कोल्हापूर या ठिकाणी भेट दिली , या गावात डोंगराळ भागात  शासकीय माध्यमिक आश्रम शाळा आहे तेथे मोफत मुलांना शिक्षण दिले जाते , एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जि. पुणे अंतर्गत ही शाळा कार्यरत आहे , या शाळेत  प्रथम आदिवासी विदयार्थ्यांना प्राधान्य आहे.परंतु दाखल्या अभावी आदिवासी मुलांना शिक्षणापासुन वंचित रहावे लागत  आहे  .अदिवासी  आश्रमशाळेत आदिवासी  विदयार्थीच शिक्षणापासुन वंचित आहेत, शासनाने याची दखल घेण्याची गरज आहे . तसेच आश्रम शाळेत कला शिक्षक व शारिरीक शिक्षण  शिक्षक यांची उणीव जाणवते , पत्रकार विदयार्थ्यांनी शाळेतील शिक्षक , विदयार्थी यांचेशी संवाद साधला असता वरील माहिती मिळाली , गावातील सरपंच व नागरीक यांचेशी संवाद साधला या अभ्यासक्रम क्षेत्र भेटीचे नियोजन  श्री मारूती पाटील सर , श्री जाधव सर, श्री बन्ने सर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले .


No comments :

Post a Comment