Monday, 20 March 2017
भारती विद्यापीठाच्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनींचा आविष्कार - अंधाच्या दुुःखावर फुंकर घालण्यासाठी तयार केली ब्लाइंड स्टीक
हेरले/ सुधाकर निर्मळे
दि.१९/३/१७
सामाजिक बांधिलकीची भान ठेवून अंधाच्या दुुःखावर फुंकर घालण्यासाठी शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये प्रोजक्टच्या माध्यमातून अंधांना अडथळ्याची माहिती मिळण्यासाठी भारती विद्यापीठाच्या इंजिनीअरिंग अँड टेलिकम्युनिकेशनच्या तीन विद्यार्थिनीनी ब्लाइंड स्टीक तयार केली आहे.ही स्टीक अंधांना आधारवड ठरणार आहे.
श्री शाहू हायस्कूल कागलच्या माजी विद्यार्थिनीनी अमृता घाटगे,श्वेता जाधव व दीक्षा कांबळे या तीन विद्यार्थिनी भारती विद्यापीठाच्या इंजिनीअरिंगच्या इंजिनीेंअरिंग अँड टेलिकम्युनिकेशनच्या विभागात शिकत आहेत.
जानेवारीमध्ये ह्नतिक रोशनचा 'काबील' चित्रपट प्रदर्शित झाला. या सिनेमावरून या तीन विद्यार्थिनीनी या चित्रपटाची प्रेरणा घेऊन शैक्षणिक अभ्यासक्रमातील प्रोजेक्ट करतांना त्यांनी सुमारे दोन तीन फुटांवरील अडथळ्याची माहिती मिळावी यासाठी ब्लाइंड स्टीक तयार करण्याचा निर्धार केला.शैक्षणिक सत्राचा हा प्रोजेक्ट भाग असला तरी या तिन्ही विद्यार्थिनींंनी प्रोजेक्ट समाजपयोगी व्हावा,यासाठी विचार विनिमय केला. मार्गदर्शक व प्राचार्यांशी चर्चा करून नेत्रहिनांना अडथळे दूर करण्याचा विचार प्रोजेक्टमध्ये करण्यात आला.त्यातूनच सुमारे दोन तीन फुटावरील अडथळ्यांची माहिती मिळणारी काठी तयार करायला सुरूवात झाली.
या माध्यमातून वस्तू शोध प्रणालीचा वापर करुन ठराविक अंतरावरील अडथळा अल्ट्रासॉनिक सेंसरद्वारे मिळेल,अशी व्यवस्था करण्यात आली. या सेंसरमधून हेडफोनद्वारे अडथळा असल्याची माहिती मिळून बझरही वाजेल,या प्रणालीमुळे समोरील धोक्यापासून बचाव करणे शक्य होणार आहे.
काबिल चित्रपटातून प्रेरणा घेऊन तयार केलेल्या स्टीकलाही त्यांनी 'काबिल' हेच नाव दिले आहे.सुमारे दोन तीन फुटांवरील अडथळ्यांची माहिती अंधांना मिळणार असल्याने महाविद्यालयीन स्तरावर या उपक्रमाला प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळाला आहे.
प्रोजेक्ट बनवतांना १५ हजार खर्च आला असला तरी व्हीएलएसएचा वापर केल्यास काठीची किंमत दोन हजारपर्यंत येणार असल्याचा दावा विद्यार्थिनींनी केला आहे.याविद्यार्थीनींना प्रोजेक्टसाठी प्रा.एस.एस.पोवार,प्रा.जे.के.पाटील आणि प्राचार्य डॉ.सुहास पाटील यांचे मार्गदर्शन लाभले
अमृता घाटगे बोलताना म्हणाल्या
ब्लांईड स्टीकद्वारे नेत्रहिनांना अडथळ्याची माहिती त्त्वरित मिळणार आहे.प्रोजेक्टच्या माध्यमातून तयार केलेल्या स्टीकला १५ हजार खर्च आला असला तरी व्हीएलएसएचा वापर करून ती केवळ दोन हजारापर्यंत वाजवी किंमतीमध्ये ती नेत्रहिनांना देता येईल.
फोटो
श्री शाहू हायस्कूलमध्ये ब्लाईंड स्टीकचे प्रात्यक्षिक दाखवितांना माजी विद्यार्थिनी अमृता घाटगे व श्वेता जाधव.
(छाया-सुधाकर निर्मळे)
No comments :
Post a Comment