Tuesday, 28 March 2017
विजयमाला मंडलिक यांच्या स्मृतिदिनानिमित्त रोगनिदान शिबिर : नगराध्यक्ष राजेखान जमादार
मुरगूड (प्रतिनिधी) : सौ. विजयमाला सदाशिवराव मंडलिक यांच्या ३५व्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवार दि. ३१ रोजी सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन मुरगूड नगरपरिषदेतर्फे करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जमादार म्हणाले की, येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये सकाळी ९ ते २ या वेळेत होणाऱ्या या शिबिरात अनेक गंभीर रोगांचे निदान व उपचार करण्यात येणार आहे. जिल्हयातील नामवंत रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर्सकडून रुग्णांची मोफत तपासणी केली जाणार आहे. तसेच औषधोपचार व आवश्यक असल्यास शासकीय योजनेतून मोफत शस्त्रक्रिया (ऑपरेशन) केली जाणार आहेत.
निवृत्त सह.शिक्षण उपसंचालक संपतराव गायकवाड याच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन होणार आहे. शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्रा.संजय मंडलिक अध्यक्षस्थानी आहेत. आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. धारुरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. पाटील, डॉ. जयप्रकाश रामानंद, वैशाली मंडलिक, पं. स.उपसभापती कमल पाटील, वीरेंद्र मंडलिक, प्रकाश पाटील, विश्वास कुऱ्हाडे, जि. प.सदस्या शिवानी भोसले, पं.स.सदस्य विजय भोसले, मनीषा सावंत, पूनम महाडिक, वैद्यकीय अधीक्षक सौ. तारळकर उपस्थित राहणार आहेत. या पत्रकार परिषदेस नगरसेवक शिवाजीराव चौगले, विशाल सूर्यवंशी, सुहास खराडे, प्रवीण सूर्यवंशी, दत्तात्रय मंडलिक, अमर चौगले आदी उपस्थित होते.
No comments :
Post a Comment