Powered by Blogger.

Friday, 3 March 2017

बिद्री कारखान्याला उर्जितावस्था आणणार -रणजितसिंह पाटील

No comments :

मुरगुड प्रतिनिधी

समीर कटके

बिद्री साखर कारखाना तीन तालुक्यातील शेतकऱ्यांचा तारणहार व भाग्यविधाता आहे. गोरगरीब

शेतकऱ्यांच्या आयुष्यात अतिशय महत्व असणारी ही आर्थिक संस्था केवळ बेशिस्त व अकारण लुडबुड

यामुळे ग्रासली आहे राजकीय हेवेदाव्यातून नव्हे तर हजारो कटुंबांची भाग्यवाहिनी असणाऱ्या सहकारी

कारखान्याचे हित हा उद्देश समोर ठेऊन जोपर्यंत संधी मिळेल तोपर्यंत आपण कार्य करणार

आहोत.शाहू व हुतात्मा साखर कारखान्याप्रमाणे शिस्त व पारदर्शक तोडणी कार्यक्रम हा आपला अजेंडा

असून ' न खाउंगा ना खाणे दुन्गा ' अशा स्पष्ट शब्दात आपली भूमिका बिद्री साखर कारखान्याचे

नवनियुक्त अशासकीय संचालक रणजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली.

मुरगुड ता कागल येथे ते पत्रकारांशी बोलत होते. बिद्रीच्या अशासकीय संचालक मंडळावर नियुक्ती

झाल्या नंतर प्रथमच त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

बिद्रीचे संस्थापक अध्यक्ष कै व्ही टी पाटील, विश्वनाथराव पाटील, शिवाजीराव खोराटे, बळवंत संतराम

पाटील, दिनकरराव नलवडे, बापू गोपाळ देसाई, किसनराव मोरे, चिमसाहेब घाटगे, बापूसाहेब भोसले,

यांच्या निःस्वार्थी व त्यागी सेवेतून या कारखान्यास उर्जितावस्था आली. साडेसात हजार गळीत क्षमता

असणारा कारखाना आज बेशिस्त, राजकीय हस्तक्षेप, ऊस तोडणी कार्यक्रमात चालणारी वशिलेबाजी

यामुळे ग्रासला आहे.

सुपीक जमीन, ऊसाची उपलब्धता, कार्यक्षम अनुभवी मनुष्यबळ असतानाही शेतकऱ्यांना त्यांच्या

श्रमाचा योग्य परतावा देऊ शकत नाही.ऊस तोडल्यानंतर सहा ते आठ तासात गळीत होणे आवश्यक

असते. चुकीच्या ऊस तोडणी कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांचा ऊस तोडल्यानंतर 24 ते 30 तास वाहन तळावर

पडून रहातो. त्यामुळे रिकव्हरी कमी येते कारखान्याचे पर्यायाने उत्पादकांचे नुकसान होत. त्यामुळे इतर

कारखान्याना ऊस पाठवला जातो. शाहू व हुतात्मा कारखाना हे दोन कारखाने 180 दिवस चालतात.

पण बिद्री मात्र तीन महिने अगोदरच बंद होतो.

संगणक प्रणाली, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरासह कठोर उपाययोजना करून ऊस तोडणी कार्यक्रम

अमलात आणणार आहे. प्रत्येक दिवशी आठ हजार टन ऊसच कारखान्यात येईल अशी काटेकोर सिस्टम

उभा करणार आहे. लांगूनचालन वशिलेबाजी यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यावर होणारा अन्याय दूर

करण्याचा निश्चय केला आहे.

साखरेचे ब्रँडिंग व मार्केटिंग करून स्वावलंबी होणे व कोणत्याही आर्थिक, तांत्रिक व नैसर्गिक

आपत्तीमध्ये उपयुक्त ठरणारा तोटा निधी उभा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी शेतकरी

सभासद, कामगार, संघटना सर्वांचे सहकार्य घेणार आहे. भाजप शासन व नेते सहकार मंत्री चंद्रकांतदादा

पाटील यांची भूमिका पारदर्शक असून ते हाती घेतलेले कार्य पूर्ण करतातच असा त्यांचा बाणा असल्याचे

उदगार त्यांनी काढले. आपल्या नियुक्तीबाबत आक्षेप घेत के पी पाटील व संचालक मंडळ यांनी

न्यायालयात जाण्याची भूमिका घेतली आहे याबाबत विचारले असता सभासदांचा प्रश्न न्यायप्रविष्ठ

असल्याने त्या बाबत बोलणे योग्य होणार नाही असे उत्तर त्यांनी दिले.

पत्रकार परिषदेस संतोषकुमार वंडकर, दगडू शेणवी, दत्तामामा जाधव, बजरंग सोनुले,रघुनाथ बोंगार्डे, नाना

पाटील, दत्ता पाटील बेलवळे, शहाजी पाटील, प्रकाश एकल, बाळासो अण्णा पाटील, डॉ अशोज खंडागळे,

वाय एस पाटील, एकनाथ कळमकर उपस्थित होते.

No comments :

Post a Comment