Powered by Blogger.

Sunday, 5 March 2017

शिक्षकांसाठी तंत्रस्नेही कार्यशाळा संपन्न

No comments :
प्रतिनिधी - सतीश लोहार

वि स खांडेकर प्राथमिक प्रशाला कोल्हापूर येथे जिल्ह्यातील शिक्षकांसाठी तंत्रस्नेही कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली.दि 3 व 4 मार्चच्या या कार्यशाळेसाठी करवीर तालुक्यातून शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते,सध्याच्या इंटरनेट युगात संगणकाचा व मोबाईलचे  आधुनिक तंत्रज्ञान वापरून विद्यार्थ्यांना अध्यापनासाठी कसा उपयोग करता येईल याचे सखोल व विस्तृत विवेचन यावेळी करण्यात आले तसेच संबंधित प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले ,
  या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून श्री मारुती राजगोळे,वाठोरे ,सौ सोनाली मोरे,सौ शुभांगी पाटील या सर्वानी उपस्थित शिक्षकांना अत्यंत चांगली व उपयुक्त माहिती दिली तर कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन संयम हुक्कीरे यांनी केले

No comments :

Post a Comment