Saturday, 4 March 2017
डॉ किरवले यांची हत्या महाराष्ट्रातील परिवर्तनाची परंपरा संपवण्याचे षडयंत्र ? पुरोगामी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला संशय
यमगे वार्ताहर
आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ विचारवंत व शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी प्रमुख
प्रा.डॉ. कृष्णा किरवले यांची हत्या महाराष्ट्रातील विचारवंतांना संपवण्याच्या षडयंत्राचा भाग असण्याची
शक्यता नाकारता येत नाही.आयुष्यभर आंबेडकरी विद्रोही विचार संयत शब्दात मांडणाऱ्या डॉ. किरवले
यांची हत्या केवळ आर्थिक कारणातून झाली असे मानण्यास आम्ही तयार नाही.या हत्येचे कारण व त्या
पाठीमागे कोणी मास्टर माईंड आहे का याचा कसून तपास करावा. ही हत्त्या वैचारिक वादातून झाल्याचा
आम्हास संशय असून संशयित खून करण्याचा उद्देशानेच आला होता. या घटनेमुळे आंबेडकरी,
परिवर्तनवादी व डाव्या चळवळीमध्ये अस्वस्थता आहे.या प्रकरणाचा पोलिसांनी तातडीने छडा लावावा
अशी मागणी मुरगुड ता कागल येथील निषेध सभेत करण्यात आली.
अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी आपली भूमिका मांडली व घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. दलीतमित्र
प्रा डी डी चौगले म्हणाले दाभोळकर ,पानसरे, कलबुर्गी हत्येनंतर प्रा. किरवले यांची हत्या म्हणजे
महाराष्ट्रातील परिवर्तनाची विचारधारेवर आघात आहे . लोक प्रक्षुब्ध आहेत त्यांच्या समाधानासाठी
किरवले यांच्या हत्येचा छडा लवकर लावावा अशी मागणी केली एम टी सामंत म्हणाले ;परिवर्तनाची चळवळ अशी विचारवंतांचे खून करून संपवण्याच्या विकृत परंपरेतून या घटना वाढत आहेत.
महाराष्ट्र
समता परंपरेतील सुधारकांचा कि या विकृतीचा असा प्रश्न त्यांनी केलाडॉ किरवले यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी शिव-शाहू, फुले, आंबेडकरांचा जयघोष व हल्लेखोराच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.निषेध सभेस शिवाजी कांबळे, बी एस खामकर, संजय घोडके, रवी कांबळे, सुनील गवळी, प्रदीप वर्णे,सिकंदर जमादार, एस एम कांबळे, , ए पी कांबळे, राजू कांबळे, दयानंद सागर, सुनील आप्पासो कांबळे, प्रमोद कांबळे, सुहास कांबळे, मनोहर माळगे, प्रा. एस एम सोहनी, प्रा पांडुरंग सारंग, राजू चव्हाण उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment