Powered by Blogger.

Thursday, 16 March 2017

राजकारण जिंकले समाजकारण हारले !!!

No comments :

प्रतिनिधी--समीर कटके
मानव हक्क कार्यकर्त्या इरोम शर्मिला चानु यांनी शनिवारी राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. णिपूरचे मुख्यमंत्री ओक्रम सिंघ  यांच्या विरोधात थोउबल मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना केवळ 90 मते मिळाली होती.ही मते नोटा साठी पडलेल्या मतांपेक्षा कमी आहेत.
      या निराशाजनक अनुभवानंतर 44 वर्षीय शर्मिला यांनी राजकारणाला तिलांजली देण्याचा निर्णय घेतला. सशस्त्र सेनादलास आफ्सपा (एएफएसपीए) कायद्याद्वारे दिलेल्या अमर्याद अधिकाराच्या विरोधात सोळा वर्षे केलेल्या उपोषणामूळे त्या लोकांना ज्ञात होत्या. राजधानी इंफाळ मध्ये अत्यंत साध्या घरात, एकाकी कोणा समर्थकाशिवाय त्या बसल्या होत्या.पत्रकारांशी बोलताना  त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले लोकांनी मला खाली उतरण्यास भाग पाडले अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.निवडणुकांचे निकाल पाहिल्यानंतर  मला राजकारणाचा वीट आला आहे.थोउबल मध्ये प्रचार करताना लोक सहानुभूती दाखवत होते. पण सहानुभूती मतांमध्ये रूपांतरित झाली नाही. लोकांची बुद्धी व भावना यामधील विरोधाभास मला समजत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात त्यांनी आपले 16 वर्षांपासून सुरु असणारे उपोषण मागे घेऊन सक्रिय राजकारणात सहभागी होणार असल्याची घोषणा केली होती. निवडणुकीतील दारुण पराभवानंतर आत्मभान व मन शांतीसाठी केरळमध्ये आश्रमात ध्यान साधना करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पीपल्स रिसर्जन्स अँड जस्टीस अलायन्स हा त्यांचा पक्ष टिकून रहावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राजकीय निरीक्षकांच्या मते साधने व आर्थिक स्थिती हे त्यांच्या मार्गातील प्रमुख अडथळे होते, त्यामुळेच त्यांना अपयशाचा सामना करावा लागला.

No comments :

Post a Comment