Thursday, 16 March 2017
मुरगुड प्रिमिअर लीग फुटबॉल स्पर्धेत लालआखाडा व्यायाममंडळ विजेता

मुरगुड ता कागल येथे घेण्यात आलेल्या मुरगुड प्रिमिअर लीग फुटबॉल स्पर्धेत लाल आखाडा व्यायाम
मंडळाने प्रथम क्रमांक अजिंक्यपद पटकावले.चुरशीच्या अंतिम सामन्यात लकी वॉरीअर्स संघास
उपविजेतेपद पटकावले.स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस जे एल स्पोर्ट्स व मंडलिक युवा प्रतिष्ठान
या संघांनी मिळवले.
तीन दिवस चाललेल्या स्पर्धेत निमंत्रित संघ व खेळाडू सहभागी झाले. लाल आखाडा संघात सिद्धेश
पोतदार, शिवाजी मोरबाळे, अजिंक्य तिकोडे, पृथ्वीराज देसाई,पंकज डेळेकर, आकाश उपलाने यांनी उत्तम
खेळाचे प्रदर्शन केले. तर वॉरिअर्स कडून आकाश तोडकर, राजू जाधव, सुहास भारमल, सुरज अरागडे,
स्वप्नील अर्जुने, आकाश शितोळे, सागर लांबोरे यांनी उत्तम कामगिरी केली.
बक्षीस वितरण समारंभ पदमसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दगडू शेणवी, बजरंग
सोनुले, नगरसेवक रविराज परीट,राजू आमते, सागर वाडेकर उपस्थित होते.प्राथमिक फेऱ्यातील
सामन्यांमध्ये ओंकार तांबट, सौरभ पाटील, भाऊ पावडकर यांनी सामनावीर पारितोषिक देण्यात
आले.यावेळी कोच गौतम पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
स्पर्धा संयोजन आकाश तोडकर, सुनील घाटगे यांनी केले. स्वागत प्रास्ताविक समाधान पोवार यांनी
केले. आभार सुनील घाटगे यांनी मानले.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment