Wednesday, 8 March 2017
लंकन नौदलाने केलेल्या अंधाधुंद गोळीबारात मच्छीमार तरुण मृत्युमुखी
प्रतिनिधी समीर कटके
शेकडो मच्छीमार बांधवांनी आपल्या एका सहकार्यास श्रीलंकन नौदलाच्या सैनिकांनी ठार मारल्याचा आरोप करून तामिळनाडूच्या रामेश्वरम येथे निषेध आंदोलन केले. हे प्रकरण गंभीरपणे घेत मुख्यमंत्री इडापड्डी के पलानीस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केंद्र सरकारने या विषयी हस्तक्षेप करावा व चौकशी करावी अशी मागणी केली आहे. तामिळनाडूतील विरोधी पक्षानी या घटनेचा निषेध करून केंद्राने कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
एक बावीस वर्षीय स्थानिक
मच्छीमार तरुण आपल्या यांत्रिक बोटीतून मच्छीमारी करत असताना कतचतीवू पासून काही अंतरावर लंकन नौदलाने केलेल्या अंधाधुंद गोळीबारात मृत्युमुखी पडल्याचा आरोप मच्छीमारांनी केला आहे.
रामेश्वरम येथील थंगाचीमदम येथे मृत युवकांच्या कुटुंबीयांनी व आंदोलनकर्त्यांनी जोपर्यंत केंद्रीय मंत्री भेट देवून अश्या घटना भविष्यात होणार नाहीत असा भरवसा देत नाहीत तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली असल्याची माहिती रामेश्वरम मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष एस. एमिरेट यांनी दिली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शव विच्छेदानादरम्यान मृताच्या मानेत एके 47च्या गोळ्या सापडल्या आहेत.
मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी केन्द्र शासनास लिहिलेल्या पत्रात या प्रश्नाबाबत शासनाने कडक भूमिका घेऊन श्रीलंकेच्या उच्चआयुक्तांना तातडीने उपस्थित होण्याचा आदेश द्यावा व लंकेच्या नौदल सैनिकांनी केलेल्या बेदरकार व अंदाधुंद गोळीबाराबद्दल तसेच दोन्ही देशात पूर्वी झालेल्या करारांची श्रीलंकेकडून वारंवार होणारी पायमल्ली याबाबत भारत व तामिळनाडू सरकारच्या तीव्र भावना व्यक्त कराव्यात अशी मागणी केली आहे. लंकेकडून अशा प्रकारे अमानवी व रानटी रणनीतीचा वापर होत असल्याने दोन देशातील संबंध सुधारण्यासाठी जे राजनायिक प्रयत्न होत आहेत ते फोल ठरतील असेही पलानीस्वामी यांनी पत्रात म्हटले आहे.
पाल्क समुद्र क्षेत्रात पिढ्यानपिढ्या मासेमारी करणाऱ्या परवानाधारक मच्छीमारांवर जोर जबरदस्ती करायची नाही हे जानेवारी महिन्यात झालेल्या कोलोम्बो येथील मंत्रीस्तरीय द्विपक्षीय बैठकीत मान्य केले असतानाही असा अमानुष गोळीबार केला आहे याचा निषेध करण्यात आला.
शेकडो मच्छीमार बांधवांनी आपल्या एका सहकार्यास श्रीलंकन नौदलाच्या सैनिकांनी ठार मारल्याचा आरोप करून तामिळनाडूच्या रामेश्वरम येथे निषेध आंदोलन केले. हे प्रकरण गंभीरपणे घेत मुख्यमंत्री इडापड्डी के पलानीस्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केंद्र सरकारने या विषयी हस्तक्षेप करावा व चौकशी करावी अशी मागणी केली आहे. तामिळनाडूतील विरोधी पक्षानी या घटनेचा निषेध करून केंद्राने कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
एक बावीस वर्षीय स्थानिक
रामेश्वरम येथील थंगाचीमदम येथे मृत युवकांच्या कुटुंबीयांनी व आंदोलनकर्त्यांनी जोपर्यंत केंद्रीय मंत्री भेट देवून अश्या घटना भविष्यात होणार नाहीत असा भरवसा देत नाहीत तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली असल्याची माहिती रामेश्वरम मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष एस. एमिरेट यांनी दिली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शव विच्छेदानादरम्यान मृताच्या मानेत एके 47च्या गोळ्या सापडल्या आहेत.
मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी केन्द्र शासनास लिहिलेल्या पत्रात या प्रश्नाबाबत शासनाने कडक भूमिका घेऊन श्रीलंकेच्या उच्चआयुक्तांना तातडीने उपस्थित होण्याचा आदेश द्यावा व लंकेच्या नौदल सैनिकांनी केलेल्या बेदरकार व अंदाधुंद गोळीबाराबद्दल तसेच दोन्ही देशात पूर्वी झालेल्या करारांची श्रीलंकेकडून वारंवार होणारी पायमल्ली याबाबत भारत व तामिळनाडू सरकारच्या तीव्र भावना व्यक्त कराव्यात अशी मागणी केली आहे. लंकेकडून अशा प्रकारे अमानवी व रानटी रणनीतीचा वापर होत असल्याने दोन देशातील संबंध सुधारण्यासाठी जे राजनायिक प्रयत्न होत आहेत ते फोल ठरतील असेही पलानीस्वामी यांनी पत्रात म्हटले आहे.
पाल्क समुद्र क्षेत्रात पिढ्यानपिढ्या मासेमारी करणाऱ्या परवानाधारक मच्छीमारांवर जोर जबरदस्ती करायची नाही हे जानेवारी महिन्यात झालेल्या कोलोम्बो येथील मंत्रीस्तरीय द्विपक्षीय बैठकीत मान्य केले असतानाही असा अमानुष गोळीबार केला आहे याचा निषेध करण्यात आला.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment