Wednesday, 8 March 2017
प्रशांत परिचारक यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार
भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी सीमेवर लढणाऱ्या जवानांचा अक्षम्य अपमान केला होता, आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी विधानसभेत लावून धरली आहे , परिचारक यांना निलंबित करण्यात येणार आहे. तशी शिफारस विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात येईल, असं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
“पंजाबमधील सैनिक एकदाही घरी न येता वर्षभर सीमेवर लढत असतो आणि त्याला फोन येतो तुला मुलगा झाला. त्या आनंदात तो पेढे वाटतो. राजकारणही तसंच आहे, ” असं वादग्रस्त वक्तव्य परिचारक यांनी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील भोसेमध्ये उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत केलं होतं.
विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील एकाही वृत्तपत्रात याविषयी साधी एका ओळीचीही बातमी आली नव्हती , सर्व संपादक व वार्ताहर सामील झालेत ,असा आरोप सोशल मिडीयावर होऊन या भाषणाचा व्हिडीओ सर्व भारतभर व्हायरल झाला मग मात्र टीव्ही व वृत्तपत्रांना नाईलाजाने का होईना याची दखल घ्यावीच लागली होती
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment