Friday, 10 March 2017
मुरगूड कोळेकर कुटुंबाला खा.धनंजय महाडिक यांच्यातर्फे ५० हजारांची धनादेशाद्वारे मदत
मुरगुड प्रतिनिधी - समीर कटके
मुरगूड (ता. कागल) येथील बाजारपेठेतील धनंजय कोळेकर यांच्या घर व दुकानास आग लागून कोळेकर
यांच्यासह त्यांच्या पत्नीचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यांचा मुलगा रोहित कोळेकर यास मदत
म्हणून खा. धनंजय महाडिक यांच्यातर्फे आज (गुरुवार) ५० हजारांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
मुरगूड (ता. कागल) येथील बाजारपेठेतील धनंजय कोळेकर यांच्या घर व दुकानास दि. २३ फेब्रुवारी
रोजी मध्यरात्री आग लागून कोळेकर यांच्यासह त्यांच्या पत्नीचा होरपळून मृत्यू झाला होता. दुकान व
घरातील सुमारे ५० लाखांच्या साहित्याचे भस्मसात झाले होते. यामुळे कोळेकर परिवाराचे प्रचंड नुकसान
झाले होते. त्यांची दोन्ही मुले अनाथ झाली होती. घटनेनंतर खासदार धनंजय महाडिक यांनी कोळेकर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्याचवेळी त्यांनी कोळेकर कुटुंबाला तातडीची पन्नास
हजारांची मदत जाहीर केली होती.
आज त्यांनी ५० हजारांचा धनादेश रोहित कोळेकर याला सुपूर्द केला. या वेळी मुरगूडचे नगरसेवक राहुल
वंडकर यांचेसह राजू चव्हाण, पांडुरंग कोळेकर, संदीप भारमल, संदेश शेणवी आदी उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment