Friday, 17 March 2017
श्री शाहू हायस्कूल ज्युनिअर कॉलेज कागल मध्ये शिक्षण महर्षी प्राचार्य एम.आर.देसाई यांच्या स्मृतिदिन निमित्त कार्यक्रम
हेरले/प्रतिनिधी दि.१७/३/१७
शिक्षण महर्षी प्राचार्य एम.आर.देसाई यांनी इग्लंडमधून शैक्षणिक क्षेत्रातील उच्च पदवी संपादन केली.या पदवीचा उपयोग समाजातील अज्ञानरूपी अंधार दूर करण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात कोल्हापूर जिल्ह्यात प्राथमिक,माध्यमिक शाळा स्थापन करुन ग्रामिण भागात शिक्षणाची गंगा आणली.त्यांचे कार्य दीपस्तंभा सारखे आहे.असे प्रतिपादन प्राचार्य एम.बी.रुग्गे यांनी केले.
ते श्री शाहू हायस्कूल ज्युनिअर कॉलेज कागल मध्ये शिक्षण महर्षी प्राचार्य एम.आर.देसाई यांच्या स्मृतिदिन निमित्त कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
प्राचार्य रूग्गे पुढे म्हणाले की,शिक्षणमहर्षी एम.आर.देसाई यांनी प्राचार्य,शिक्षणाधिकारी,आमदार या पदाच्या माध्यमातून विदयार्थी,शिक्षक,समाज यांच्या उन्नत्तीसाठी आपले आयुष्य खर्ची घातले.स्वातंत्र्यपूर्व काळात प्राथमिक,माध्यमिक,दोनशे ते दोनशे पन्नास स्थापन केलेल्या शाळा स्वातंत्र्या नंतर शासनास सुपुर्द केल्या.त्यांनी संस्कृत ग्रंथ,वेद,उपनिषीदे यांचे संस्कृतमधून मराठीमध्ये अनुवाद केल्याने त्यांना महाराष्ट्र शासनाने संस्कृत पंडीत उपाधी देऊन सन्मानित केले होते.त्यांनी शिक्षणमहर्षी बॅरिस्तर बाळासाहेब खर्डेकर यांच्या साथीने शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन करून ज्ञानाची ज्योत प्राथमिक,माध्यमिक,महाविदयालयाच्या रूपातून आजपर्यत तेवत ठेवली आहे.त्यांचे शैक्षणिक,सामाजिक,सांस्कृतिक क्षेत्रातील कार्य अतुलनिय आहे.
प्रथमतः प्राचार्य एम.बी.रूग्गे यांच्या हस्ते प्राचार्य एम.आर.देसाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालण्यात आला.यावेळी के.एच.भोकरे ,एच.एस.लकडे यांनी मगोगते व्यक्त केली.
या प्रसंगी उपमुख्याध्यापक आर.जी.देशमाने,उपप्राचार्य पी.एन.शिंदे,पर्यवेक्षिका एस.ए.कुलकर्णी,तंत्रविभाग प्रमुख एस.यु.देशमुख,एस.एम.नाईक,एस.वाय. बेलेकर,संजय पोतदार आदीसह शिक्षकवृंद विदयार्थी उपस्थित होते.सूत्रसंचालन कादर जमादार यांनी केले.आभार टी.ए.पाटील यांनी मानले.
फोटो - शिक्षण महर्षी प्राचार्य एम.आर.देसाई यांच्या प्रतिमेचे पूजन करतांना प्राचार्य एम.बी.रूग्गे,व इतर मान्यवर.
No comments :
Post a Comment