Sunday, 23 April 2017
न्हाव्याचे पोर 'मिलिनेयर बार्बर ' -रोल्स रॉईससहित 378 कारचा मालक
प्रतिनिधी - ज्ञानराज पाटील
ही कथा आहे धाडसाची, आत्मविश्वासाची, आकाशाला गवसणी घालणाऱ्या प्रचंड इच्छाशक्तीची, सामान्य माणसाच्या कर्तृत्वाची, याच बळावर एका सामान्य न्हावि ४ कोटींच्या रोल्स रॉईस गाडीचा मालक होण्याची ! मित्रानो स्वप्नवत अशी वाटणारी हि सत्यकथा कुठली परदेशातील नसून कर्नाटकातील बेंगलोरची आहे ,
मागे काही दिवसांपूर्वी कोल्हापुरात गेस्ट लेक्चरर म्हणून बेंगलोरचा रमेशबाबू हा न्हावी आला होता ( माफ करा या लेखामध्ये न्हावी हा उल्लेख जातीवाचक नसून व्यवसायवाचक आहे कारण कोणीही मनुष्य जातीने श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरत नसून तो कर्माने सिद्ध होत असतो ) यावेळी बऱ्याच श्रोत्यांनी त्याच्या अनुभव कथनाचा लाभ घेतला पण अनेक लोकांना प्रेरणादायी ठरेल अशी भारावलेली त्याची कहाणी खास आज तुमच्यासाठी सादर करत आहे .
रमेशबाबूंचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे वडील व्यवसायाने एक सामान्य न्हावी. ते जेमतेम सात वर्षांचे असताना त्यांचे वडील त्यांना सोडून गेले.१९७९ सालची गोष्ट आहे हि म्हणजे आजपासून ३७ वर्ष जुनी .बेंगलोरमधील ब्रिगेड रोडवर त्यांच्या वडलांचे सलून होते. पण रमेशबाबूंचे वडील वारल्यानंतर त्यांच्या काकांनी ते चालवायला घेतले. त्याबदल्यात ते रमेशबाबूंच्या आईला रोजचे दयायचे फक्त पाच रूपये. त्या काळात देखील पाच रूपये म्हणजे काहीच नसल्यासारखे होते. पाच रूपयांनी रमेशबाबूंच्या कुटुंबाचे काय होणार होते ? म्हणून त्यांनी शाळा शिकता शिकता पेपर टाकायला सुरू केले. त्यासोबतच घरोघरी दुध टाकण्याचे काम सुद्धा केले. त्यांच्या राबणाऱ्या आईला थोडीबहुत पैशांची मदत मिळावी म्हणून ते जे जे मिळेल ते ते काम करत गेले. काम करत करत त्यांनी कसेबसे आपले दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले .
रमेशबाबू बाबांचे सलून माझ्या ताब्यात घेतले आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला त्यांनी सलूनमध्ये काम करायला सुरूवात केली. रमेशबाबू व्यवसायातल्या बारकाव्यांचा जाणीवपूर्वक अभ्यास करू लागले. दररोज न चूकता ते सकाळी सलूनमध्ये असायचे, तर संध्याकाळी कॉलेजमध्ये. कॉलेज संपले की ते रात्री पुन्हा सलूनमध्ये काम करण्यासाठी जायचे. सलून पहाटे एक वाजेपर्यंत सुरू असायेचे. तेव्हापासून रमेशबाबू न्हावी म्हणून ओळखले जाऊ लागले.
१९९३ साली रमेशबाबूंच्या काकांनी एक छोटी कार विकत घेतली होती. आपल्या काकांकडे कार आहे हे पाहून आपल्य़ाकडेही कार असावी असे त्यांना वाटू लागले. काटकसर करून बँकेत त्यांनी जी काही रक्कम जमा केली होती त्यावर त्यांनी बँकेचे कर्ज काढले आणि ईर्षेपोटी एक मारूती व्हॅन विकत घेऊनच टाकली. त्यावेळी रमेशबाबू खुप खूश होते. त्यांंची छाती फुगली होती. कारण त्यांची कार काकांच्या कारपेक्षा मोठी होती. रमेशबाबूंनी धाडस करून कार घेतली खरी पण त्यांच्यासाठी ते वाटले तितके सोपे नव्हतेच. याचे कारण म्हणजे त्यांनी काढलेल्या कर्जाच्या व्याजाची रक्कम ६२०० रुपये इतकी होती. ही रक्कम भरण्यासाठी त्यांचे नाकी नऊ येऊ लागले. त्यामुळे पुढे गाडीचे कर्ज फेडण्यासाठी त्यांना त्यांच्या आजोबांची मालमत्ता गहाण टाकावी लागली.
रमेशबाबूंची आई ज्या घरचे काम करायची त्या घरमालकीणीचे नाव नंदिनी. रमेशबाबू त्यांना नंदिनी अक्का म्हणायचे. तसे म्हणायला त्यांना खूप आवडायचे. त्या नंदिनी अक्कांनी रमेशबाबूंना एक कल्पना सुचवली. त्या म्हणाल्या, " अरे रमेश, तू तुझी कार इथे तिथे पार्क करून ठेवण्यापेक्षा ती भाड्याने का देत नाहीस? कल्पना अजिबात वाईट नव्हती. रमेशबाबूंना ती फार आवडली. मग कार भाड्याने देण्याचा व्यवसाय कसा करतात याबाबत नंदीनी अक्कांनी त्यांना महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या.
सन 2004 पर्यंत रमेशबाबूंकडे केवळ पाच ते सहाच गाड्या होत्या. या उद्योगाकडे पूर्णपणे लक्ष केंद्रीत करता यावे म्हणून हळूहळू पुढे सलूनचा व्यवसाय बंद करावा असा विचार त्यांच्या मनात सुरू झाला. पण रमेशबाबूंचा हा उद्योग जसा चालायला हवा होता तसा मात्र मुळीच चालत नव्हता. याचे कारण म्हणजे पुष्कळ लोकांकडे छोट्या गाड्या होत्या. त्यामुळे या व्यवसायात मोठी स्पर्धा होती. म्हणून आता आपण महागड्या लक्झरी गाड्या घेतल्या पाहिजेत. कारण या व्यवसायात मोठ्या गाड्या असणारे नव्हते. त्यामुळे त्यांचा उद्योग तेजीत चालेल असे त्यांना वाटले.
रमेश बाबूंनी एका टीव्ही वहिनीला मुलाखत देताना भाष्य केले कि " जर तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, तर मग धोकाही पत्करण्याची तयारी असावी लागते. २०११ मध्ये जेव्हा मी माझी पहिली रोल्स रॉयस ही महागडी लक्झरी गाडी विकत घेतली तेव्हा अनेकांनी मला सांगितले की मी हे अत्यंत धोकादायक पाऊल उचलले आहे. पण मी विचार केला की आपण २००४ मध्ये असाच धोका पत्करला होता, मग आता काही वर्षांनी दुसरा धोका पत्करण्यात काय हरकत असावी? आणि या गाडीसाठी मी चार कोटी रुपये मोजले. पण पुन्हा एकदा मी पत्करलेल्या धोक्याने मला मुळीच निराश केले नाही, चांगला परतावा दिला. आता तीन वर्षांचा काळ लोटला आहे. माझी गाडी चांगली प्रसिद्धही झालेली आहे.
आज रोजी त्यान्च्याकडे 1 Rolls RoycE , 4 Benz S क्लास, 8 BMW 7 SERIES 15 मर्सिडीझ Benz E क्लास या गाड्यांसह 378 लहान मोठ्या कारचा ताफा असून लवकरच ८ कोटीची लिमोझीन घेणार आहेत व 700 च्या वर गाड्यांचा ताफा करण्याचा त्यांचा मानस आहे पण एक गोष्ट मात्र मानलं भावली ती म्हणजे रोज एक तास तरी न्हाव्याचे काम ते करतातच फक्त १०० रुपयांमध्ये केस कापतात म्हणजे कष्टाची पहिली भाकरी ते विसरले नाहीत . तर त्यांच्या रोल्स रॉयस चे दिवसाचे भाडे आहे 50000 रुपये !
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)

No comments :
Post a Comment