Powered by Blogger.

Sunday, 23 April 2017

कागल एमआयडीसी येथे कामगार वर्गासाठी मोफत एड्स जनजागृती कार्यशाळा

No comments :

हेरले / प्रतिनिधी दि. २३/४ /१७

सामाजिक बांधिलकी उपक्रम अंतर्गत महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या माध्यमातून गोकुळ शिरगाव व कागल एमआयडीसी परिसरातील सर्व कंपनी कामगार याच्यासाठी 2012 पासून युवा ग्रामीण विकास संस्था, स्थंलातरित कामगार लक्षगट हस्तक्षेप प्रकल्प कोल्हापूर या संस्थेच्या वतीने
मोफत मोफत आरोग्य तपासणी शिबीर व एच.आय.व्ही /एड्स जनजागृती कार्यशाळा घेण्यात
येतात.याकरिता सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे असे मत प्रकल्प व्यवस्थापक मोहन सातपुते यांनी केले
कागल फाईव्ह स्टारएमआयडीसीतील महिला कामगारांसाठी आयोजित एड्स जनजागृती अभियान प्रसंगी ते बोलत होते .
अध्यक्षस्थानी लेबर ऑफिसर दिगबर पाटील होते संस्था मार्गदर्शक प्राचार्य अर्जुन आबिटकर (माजी जि. प. सदस्य कोल्हापूर )याच्या व्यवस्थापन व  प्रकल्प संचालक अतुल निकम सरकार याचे सहकार्याने विविध कामगार वर्गासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते .

स्थंलातरीत वीटभट्टी, बांधकाम,
,हॉटेल ,ऊस तोड कामगार,वाहतूक ,
, माथाडी कामगार ,भूमिहीन शेतमजूर
,स्टोन क्रशर कामगार, हमाल, कन्ट्रक्शन कामगार ,रोजदारी महिला कामगार, गारमेंट्स कामगार याच्यासाठी, मोफत सल्ला व मार्गदर्शन, औषध उपचार ,ऐच्छिक एचआयव्ही तपासणी व सल्ला व मार्गदर्शन,मोफत ऐ. आर. टी.औषध उपचार साठी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी मार्गदर्शन,माहिती, शिक्षण व संवाद प्रशिक्षण , एचआयव्ही/एड्स वर जनजागृती कार्यशाळा ,कंडोम डेमोस्ट्रेशन
,शासकीय योजनांची माहिती
,एचआयव्ही/ एड्स वर सखोल माहिती आणि सेवा ,सुविधा
पुरविण्यात येतात यासाठी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी,मुंबई व राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था नवी दिल्ली यांच्याकडून संस्थेसाठी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे .

या कार्यशाळेसाठी समुपदेशक महेश कांबळे,अस्विनी रोकडे,अस्विनी बुबनाळे,लॅब टेक्निशियन पूनम पवार,प्रदीप आवळे, सचिन आवळे ,रणजीत शिंदे, गणेश बारटक्के, मुकेश माने,सौ दिपाली सातपुते, प्रल्हाद कांबळे, हाल सिद्धनाथ कांबळे, याचे सहकार्य लाभले .
प्रास्ताविक व आभार सागर घोडके यांनी मानले
      फोटो  :-
कागल एमआयडीसी व्हाइट इम्पक्ट इंडस्ट्री येथे महिला कामगार वर्गासाठी मोफत एड्स जनजागृती कार्यशाळेत बोलताना प्रकल्प व्यवस्थापक मोहन सातपुते,शेजारी दिगबर पाटील,दिपाली सातपुते,आदी.

No comments :

Post a Comment